आयपीएल 2020चा हंगाम (IPL 2020) जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (13th IPL Season) असणार आहे. मागील दोन हंगामात भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) किंग्स इलेव्हन पंजाबचे (Kings XI Punjab) नेतृत्व केले होते.
मात्र आता 2020 च्या आयपीएल मोसमासाठी अश्विनचे दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर ट्रेडिंग केले असल्याने तो येत्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स कडून खेळेल. त्यामुळे आता पंजाबला नवा कर्णधार निवडावा लागणार आहे.
सध्या पंजाब संघात केएल राहुल कर्णधारपदासाठी पर्याय आहे. तर पंजाबचा संघ कदाचीत 19 डिसेंबरला होणाऱ्या लिलावात कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असणाऱ्या खेळाडूला संघात सामील करुन घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांचा 2020 च्या मोसमासाठी नेतृत्वाची समस्या संपेल.
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार म्हणून या तीन खेळाडूंची होऊ शकते निवड-
केएल राहुल-
केएल राहुल हा सध्या कर्णधारपदासाठी पंजाब संघात उपलब्ध असणारा क्रिकेटपटू आहे. त्याने गेल्या दोन मोसमात पंजाबच्या संघाचे यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना फलंदाजीतरी चांगली कामगिरी केली आहे.
त्याने मागील 2018 आणि 2019 या वर्षात अनुक्रमे 659 आणि 593 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलच्या कारकीर्दीत एकूण 67 सामन्यात 138.15 च्या सरासरीने 1977 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये अवघ्या 14 चेंडूत वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रमही राहुलच्या नावावर आहे. तो भारतीय संघाकडून खेळताना चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने 33 टी20 सामन्यांमध्ये 1047 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत खेळतानाही शानदार कामगिरी केली होती.
तसेच राहुल मागील काही मोसमापासून पंजाब संघाकडून खेळत असल्याने त्याला संघाबद्दल माहिती आहे. तसेच पंजाबने आयपीएल 2020साठी त्याला संघात कायम केले आहे. त्यामुळे त्यालाही येत्या हंगामासाठी पंजाब संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते.
ओएन मॉर्गन-
इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार ओएन मॉर्गन (Eoin Morgan) आयपीएलमध्ये पंजाबसह वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळला आहे. मात्र त्याला प्रभावी कामगिरी आयपीएलमध्ये करता आली नाही. पण त्याच्याकडे नेतृत्वगुण आहेत.
त्याच्याच नेतृत्वाखाली नुकतेच काही महिन्यांपू्वी इंग्लंडने विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे पंजाब त्याचा विचार करुन त्याला आयपीएलच्या लिलावात खरेदी करुन संघात समावेश करु शकतात.
त्याने आतापर्यंत आयपीएलमधील 52 सामन्यात 4 अर्धशतकांसह सर्वाधिक 21.35 च्या सरासरीने 854 धावा केल्या आहेत.
एरॉन फिंच-
एराॅन फिंचने (Aaron Finch) मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन (Australian) संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याला नेतृत्वाचा अनुभव आहे.
कसोटी कारकीर्दीवर आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने 2019 च्या आयपीएल हंगामामधून माघार घेतली होती. परंतु, येत्या 2020च्या आयपीएल हंगामासाठी फिंच परत लिलावात उतरला आहे.
फिंच आत्तापर्यंत आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. यामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (Delhi Daredevils), गुजरात लायन्स (Gujarat Lions), किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), पुणे वॉरियर्स (Pune Warriors), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) या संघांकडून खेळण्याचा त्याला अनुभव आहे. तसेच तो आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजी आणि नेतृत्वगुणांचा विचार करता पंजाब त्याला लिलावात खरेदी करुन संघात समावेश करु शकतात.
आयपीएलमध्ये त्याने 75 सामन्यांत 26.31 च्या सरासरीने 1737 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
आर अश्विनने खास ट्विट करत या विंडीज खेळाडूचे केले कौतुक
वाचा- https://t.co/pOkLVYZYOH#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi
@MarathiR #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) December 10, 2019
अशी प्रतिक्रिया देत विल्यम्सने घेतला विराटच्या नोटबूक सेलिब्रेशनचा बदला, पहा व्हिडिओ
वाचा????https://t.co/4Z2jOdMEte????#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019





