जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामात आतापर्यंत अनेक रोमांचक सामने झाले आहेत. संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. यामध्ये एकाच दिवशी दोन सुपर ओव्हर, एका सामन्यात दोन सुपर ओव्हर, खेळाडूंचे अफलातून प्रदर्शन अशा अनेक गोष्टी आपल्याला या १३व्या हंगामात पाहायला मिळाल्या आहेत. या हंगामात दुसऱ्या हाफमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या तीन संघांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
या हंगामाबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत केवळ मुंबई इंडियन्स संघानेच प्लेऑफसाठी क्वालिफाय केले आहे. दुसरीकडे मात्र, तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. इतर ६ संघांमध्ये प्लेऑफच्या ३ जागांसाठी शर्यत लागली आहे. हा हंगाम इतका रंजक आहे की, पहिल्या चारमधील चौथा संघ कोण असेल हे कदाचित शेवटच्या साखळी सामन्यानंतरच समजेल.
या हंगामात अनेक संघ असे होते, ज्यांनी सुरुवातीला चांगली कामगिरी केली. परंतु स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना पहिल्यासारखी कामगिरी करता आली नाही. त्यांना सतत पराभवाचा सामना करावा लागला. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघ होय.
दुसरीकडे मात्र असे संघ होते की, ज्यांना स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु दुसऱ्या हाफमध्ये मात्र त्यांनी चमकदार खेळ दाखवत प्लेऑफच्या शर्यतीत एन्ट्री केली. या लेखात आपण त्या ३ संघांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
३. राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राजस्थान संघाला गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर राहावे लागले होते. तरीही बेन स्टोक्सचे पुनरागमन झाल्यामुळे संघ संतुलित झाला. आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने स्टोक्सला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानेही सलामीला फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली.
दुसऱ्या हाफमध्ये राजस्थान संघाने सामने जिंकायला सुरुवात केली. मागील ५ सामन्यापैकी ३ सामने जिंकत ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहिले आहेत.
२. सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद संघालाही सुरुवातीला चांगली कामगिरी करता आली नाही. सुरुवातीला संघाचे दिग्गज खेळाडू मिचेल मार्श आणि भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे आयपीएलच्या या हंगामातून बाहेर झाले. त्यामुळे संघाला मोठा फटका बसला होता.
असे असले तरीही संघाने सावकाश का होईना पण विजयाच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली. त्यांनी मागील २ सामन्यात सलग विजय मिळवला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांंनी शेवटचा सामना जिंकला, तर निश्चितच ते प्लेऑफसाठी क्वालिफाय करतील.
१. किंग्ज इलेव्हन पंजाब
आयपीएलच्या या हंगामात सर्वात जबरदस्त पुनरागमन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने केले आहे. त्यांनी पहिल्या हाफमध्ये ७ सामन्यांपैकी ६ सामन्यात पराभव स्विकारला होता. परंतु त्यानंतर त्यांनी चांगली खेळी केली आणि ५ सामने जिंकत प्लेऑफच्या शर्यतीत आले. आता चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रविवारी (१ नोव्हेंबर) आपला शेवटचा साखळी सामना खेळत आहेत. हा सामना त्यांनी जिंकला, तर त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग लेख-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
-ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
-एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
महत्त्वाच्या बातम्या-
-हा तूझा शेवटचा सामना आहे का? प्रश्नावर धोनीने दिले ‘हे’ उत्तर
-क्रिकेटपटूंचे विक्रम अनेक पाहिले, आता ‘या’ अंपायरनेचे केलाय मोठा कारनामा
-जोडी नंबर वन! तब्बल ९४ वर्षांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या जोडीने मोडला ‘हा’ मोठा विक्रम