---Advertisement---

आयपीएल २०२० मध्ये ऑरेंज कॅपचे मानकरी ठरु शकतात हे ३ फलंदाज

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2020 4:16 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्रात आतापर्यंत अनेक नेत्रदीपक सामने पाहायला मिळाले आहेत. अनेक युवा फलंदाजांनी चांगली कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच अनेक फलंदाजांनी त्यांच्या ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याच मोलाची भूमिका निभावली. हे फलंदाज आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील आहेत. ऑरेंज कॅप ही आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. या लेखात आपण ४ फलंदाजांबद्दल आढावा घेऊ जे यंदा आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपचे मानकरी होऊ शकतात.

ते ४ फलंदाज कोण आहेत हे जाणून घेऊया –

४. श्रेयस अय्यर

आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि या हंगामात ऑरेंज कॅप जिंकणार्‍या खेळाडूंमध्ये चौथे नाव दिल्ली कॅपिटलसचा कर्णधार श्रेयस अय्यरचे आहे. श्रेयस अय्यर सध्याच्या हंगामात शानदार प्रदर्शन करत आहे. तसेच त्याची कर्णधार म्हणूनही उत्तम कामगिरी असल्याचे दिसून येते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघाने या हंगामात ६ पैकी ५ सामने जिंकले आहेत. तर अय्यरने आतापर्यंत ६ सामन्यांमध्ये २०३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३८ चेंडूत ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ८८ धावांची शानदार खेळी केली. जर श्रेयस अय्यर प्रत्येक सामन्यात अशीच चांगली कामगिरी करत राहिला तर या हंगामात तो ऑरेंज कॅप विजेता ठरू शकेल.

३. फाफ डू प्लेसिस
आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. या संघाने या हंगामात आत्तापर्यंत ६ सामने खेळले असून त्यापैकी २ सामने जिंकले आणि ४ सामने गमावले. तथापि, या वेळीदेखील फाफ डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात महत्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध होत आहे आणि जवळजवळ प्रत्येक सामन्यात त्याने धावा ठोकल्या आहेत. डु प्लेसिसने या मोसमात आत्तापर्यंत एकूण ६ सामने खेळले असून १५१ च्या स्ट्राइक रेटने २९९ धावा केल्या. ड्यू प्लेसिसनेही किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ८७ धावांची शानदार नाबाद खेळी केली होती आणि शेन वॉटसनबरोबर शानदार भागीदारी करत आपल्या संघाला दहा विकेट्सने विजय मिळवून दिला होता. त्याची उत्तम कामगिरी पाहता असे म्हणता येईल की सध्याच्या हंगामात तो ऑरेंज कॅप जिंकणार्‍या खेळाडूंच्या यादीमधील मजबूत दावेदार आहे.

२. डेव्हिड वॉर्नर

इंडियन प्रीमियर लीग २०२० मध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा प्रमुख दावेदार मनाला जातो. आयपीएल २०१९ मध्ये सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप जिंकणारा डेव्हिड वॉर्नर या हंगामातही चांगली फलंदाजी करत आहे. डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत ६ सामन्यांमध्ये २२७ धावा केल्या आहेत. त्याच्या संघाचे अजून बरेच सामने बाकी आहेत. त्याचा आताच फॉर्म पाहता डेव्हिड वॉर्नर या हंगामातही ऑरेंज कॅप जिंकू शकतो.

१. केएल राहुल

आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रवास चांगला झाला नसला, तरी संघाचा कर्णधार केएल राहुल जोरदार फलंदाजी करीत आहे. या मोसमात केएल राहुल केवळ सर्वाधिक धावा करणाराच फलंदाज नाही तर या मोसमातील सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाजही ठरला आहे. केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १३२ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने ६ सामन्यांमध्ये १३६ च्या स्ट्राइक रेटने एकूण ३१३ धावा केल्या आहेत. पंजाबचा संघ कदाचित प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही. परंतु केएल राहुल या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर राहू शकेल आणि ऑरेंज कॅप जिंकू शकेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---