---Advertisement---

एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!

On: मंगळवार, सप्टेंबर 15, 2020 7:41 AM
---Advertisement---

आयपीएलचा १३ वा हंगाम हा ऐतिहासिक होणार आहे. यावेळी कोरोना विषाणूमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये ही आयपीएल स्पर्धा खेळवली जाईल. आयपीएलच्या इतिहासात हे सर्व प्रथम आणि बहुदा शेवटच असेल. तसे, आयपीएलच्या इतिहासात असे अनेक संस्मरणीय क्षण आहेत, जे विसरले जाणे अशक्य आहेत किंवा ते या आधी कधीच पाहिले नाहीत.

ट्रेन भरून चाहते पुण्यात पोहोचले
आयपीएलच्या इतिहासातील हा वेगळाच क्षण होता, जेव्हा एका संघाचे चाहते रेल्वे गाडीने इतर शहरामध्ये दाखल झाले. निलंबनानंतर २०१८ मध्ये परत आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला असेच चाहते मिळले. आपला संघ पुन्हा मैदानावर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली, परंतु संघातील उर्वरित सामने पुण्याच्या सहारा स्टेडिअममध्ये हलविण्यात आले. हे समजताच चेन्नईच्या चाहत्यांनीही पुण्याचा रस्ता धरला आणि भरभरून चाहता वर्ग रेल्वेने पुण्यात दाखल झाला. जणू संपूर्ण पुणे स्टेशन पिवळ्या रंगाने रंगवल्यासारखं वाटू लागले होते. प्रत्येकासाठी हा एक वेगळा अनुभव होता. मग अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून विजेतेपद जिंकून चेन्नईने त्यांच्या चाहत्यांनाही भेट दिली.

रक्त येत असतानाही वॉटसनने घेतली धाव
आयपीएल २०१९ मधील अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला होता, जिथे मुंबईने सामना एका धावांनी जिंकत चौथ्यांदा आयपीएल चषक जिंकला. हा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामना ठरला होता, परंतु चेन्नईच्या विजयाच्या आशा एकट्याने उंचावणाऱ्या शेन वॉटसनला या अंतिम सामान्यनिमित्त आठवले जाते. वॉटसनने ५९ चेंडूत ८० धावा करत जबरदस्त खेळी केली होती. सामना हरल्यानंतर हरभजन सिंगने फलंदाजीच्या वेळी वॉटसनच्या गुडघ्यातून रक्तस्त्राव झाल्याचे उघड केले होते. एक झेल पकडताना त्याला दुखापत झाली होती, नंतर वॉटसनच्या गुडघ्यावर सहा टाके पडले होते.

सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगची सलामी जोडी
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे सचिन आणि पाँटिंगची सलामी फलंदाजी. दोन दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग ४ एप्रिल २०१३ रोजी आयपीएलच्या सहाव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून सलामी जोडी म्हणून मैदनात उतरले होते. हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण होता.

एबी डिव्हिलियर्स जेव्हा डेल स्टेनवर तुटून पडला
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या वतीने आयपीएलच्या ५ व्या सत्रात एबी डिव्हिलियर्सने त्याच्याच राष्ट्रीय संघातील, डेक्कन चार्जर्सचा प्रमुख गोलंदाज डेल स्टेनची चांगलीच धुलाई केली. हा सामना एक अविस्मरणीय सामना ठरला होता. जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज डिव्हिलियर्सने १७ चेंडूत ४७ धावा केल्या ज्यामध्ये त्याने ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

२०१२ मध्ये गेलचे वादळ
ख्रिस गेलची वादळी खेळी क्वचितच कोणी विसरेल. २०१२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पुणे वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात गेलने विक्रमी खेळी केली. त्याने या सामन्यात अनेक विक्रम केले. त्याने ६६ चेंडूत १७५ धावा केल्या. गेलने वेगवान शतक करून टी-२० मधील सर्वोत्तम खेळीचा विक्रम देखील नोंदविला. या सामन्यात त्याने १७ षटकार ठोकले हा या सामन्यातील दुसरा विक्रम ठरला. एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम याच सामन्यात गेलंच्या नावावर झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---