fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२० – या ५ युवा परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर…

IPL 2020 - All eyes will be on the performance of these 5 young foreign players ...

August 6, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलमध्ये स्थानिक खेळाडूंसह परदेशी खेळाडूही आपला जबरदस्त खेळ दाखवताना दिसतात. ज्याप्रमाणे भारतीय युवा खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आणि राष्ट्रीय संघाची दारे ठोकली, त्याचप्रमाणे परदेशी युवा खेळाडूदेखील आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

आयपीएलच्या नियमांनुसार ४ परदेशी खेळाडू अंतिम अकरामध्ये सहभागी होऊ शकतात. अशा वेळी परदेशी तरुण खेळाडूंनाही कौशल्य दाखविण्याची चांगली संधी असते. आयपीएलच्या लिलावात संघ मालकांनी अनेक परदेशी तरुण खेळाडूंवर पैसे खर्च करून त्यांना आपल्या संघात समावेश केल आहे.

युएईमध्ये आयोजित होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये असे बरेच परदेशी तरुण खेळाडू आहेत, ज्यांची कामगिरी सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर या लेखात अशा ५ परदेशी युवा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी करू शकतात.

आयपीएल २०२० मध्ये हे ५ युवा परदेशी खेळाडू करू शकतात चांगली कामगिरी-

१. टॉम बेंटन (Tom Banton)

आयपीएल २०२० च्या लिलावात इंग्लंडचा युवा खेळाडू टॉम बेंटन याने २० लाखांच्या यादीत आपले नाव सामील केले होते. त्याला    कोलकाता नाईट रायडर्सने १ कोटी खर्च करून आपल्या संघात सामील करुन घेतले आहे.

या हंगामात बेंटनला संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये (अंतिम ११ मध्ये) खेळण्याची अधिक संधी मिळू शकेल कारण ख्रिस लिन यापुढे संघाचा भाग नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाचे लक्ष या खेळाडूकडे असेल. टॉम बेंटनने देशांतर्गत पातळीवर इतकी चांगली कामगिरी केली की त्याला अगदी लहान वयातच त्याच्या राष्ट्रीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो ६ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांचा भाग होता.

तसेच ट्वेंटी२० क्रिकेट स्वरूपात बेंटनने ३४ सामन्यांत १५७.३३ च्या स्ट्राईक रेटसह ९४४ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या फलंदाजीद्वारे १ शतक आणि ७ अर्धशतकेही केली आहेत.

२. सॅम करन (Sam Curran)

इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू सॅम करनला २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने लिलावासाठी मोकळे केले. मग करनला चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात सामील केले. त्याला ५ कोटी रुपयांत एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या संघात घेतलं.

गेल्या हंगामात सॅम करनने आयपीएलमध्ये पदार्पण किंग्ज इलेव्हन पंजाबकडून केलं. त्या संघाकडून खेळताना या युवा खेळाडूने १० गडी बाद केले. तसेच हॅट्रिकही घेतली होती. त्याने फलंदाजीतही १७२.७२ च्या स्ट्राइक रेटने ९५ धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचा देखील समावेश होता.

या व्यतिरिक्त, करनने इंग्लंडकडून ५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ६ विकेट घेतल्या असून फलंदाजी करताना त्याच्या फलंदाजीतून फक्त ३५ धावा निघाल्या आहेत. आता आयपीएल २०२० मध्ये करन धोनीच्या नेतृत्वात खेळेल आणि प्रत्येकाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

३. अ‍ॅलेक्स कॅरी (Alex Carey)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरी आयपीएल २०२० मध्ये निश्चितच उत्कृष्ट कामगिरी करताना दिसू शकतो. आयपीएल २०२० च्या लिलावात २० कोटी ४० लाखांमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने खरेदी करून या युवा यष्टीरक्षकाला आपल्या संघात स्थान दिले आले.

दिल्लीच्या संघाने रीषभ पंतचा बॅकअप विकेटकीपर-फलंदाज म्हणून कॅरीला विकत घेतले आहे, जो गरज पडल्यास यष्टिरक्षकाची जबाबदारी घेऊ शकेल आणि खालच्या फळीत फलंदाजीस येऊ शकेल.

कॅरीने २८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२४.४६ च्या स्ट्राईक रेटने १७३ धावा केल्या आहेत. सध्या तोदेखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दिल्लीकडून कॅरीला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली कर तो आयपीएलमध्ये पदार्पण करेल आणि त्याने आधीच सांगितले आहे की रिकी पॉन्टिंगच्या प्रशिक्षणाखाली खेळण्यास तो खूप उत्सुक आहे.

४. जोश फिलिप (Josh Philip)

युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये, उत्तम कामगिरी करून लक्ष वेधून घेणार्‍या खेळाडूंच्या यादीत, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज जोश फिलिप देखील आहे.

आयपीएल २०२० च्या लिलावात फिलिपचा २० लाखांच्या किमतीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विकत घेऊन संघात समावेश केला आहे. आता आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने त्याला खेळण्याची संधी दिली तर तो आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतो.

जोश फिलिपने ३२ ट्वेंटी२० क्रिकेट स्वरुपातील सामने खेळले आहेत. यात त्याने १३८.३० च्या स्ट्राइक रेटने ७९८ धावा केल्या. ज्यामध्ये ७ अर्धशतकाचा समावेश आहे.

५. शेरफेन रदरफोर्ड (Sherfane Rutherford)

आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटलचा भाग असलेला शेरफेन रदरफोर्ड आयपीएल २०२० मध्ये मुंबई संघामध्ये खेळताना दिसणार आहे. २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रदरफोर्डने मागील हंगामात १३५.१८ च्या स्ट्राईक रेटने ७ सामन्यांत ७८ धावा केल्या.

या डावखुऱ्या फलंदाजाला जर रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली तर तो चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहे. कारण या युवा खेळाडूची आकडेवारी खरोखरच प्रभावित करणारी आहे.

त्याने ३९ ट्वेंटी२० क्रिकेट सामने खेळले आहेत ज्यात त्याने २५.४३ च्या सरासरीने आणि १६०.९६ च्या शानदार स्ट्राइक रेटने ५८५ धावा केल्या आहेत. यासह ८ विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. रदरफोर्ड हा केवळ पॉवर हिटर नसून तो कर्णधारांना गोलंदाजीसाठी देखील अतिरिक्त पर्यायही आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्याच्या इब्राहिमची इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत आघाडी

श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते

आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन

ट्रेंडिंग लेख –

विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण ‘या’ ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम

४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप

आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप


Previous Post

अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा

Next Post

आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@DelhiCapitals
IPL

फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Next Post

आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू...

भारताचा हा खेळाडू म्हणतोय, 'त्यावेळी मला वाटले मी माझ्या देशाचा विश्वासघात केलाय'

'भारत आणि इंग्लंडला पराभूत करुनच निवृत्त होईल,' पहा कोण म्हणतंय असं

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.