आज (११ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा २६वा सामना होणार आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. त्याने अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे स्टोक्स हैदराबादविरुद्ध त्याचा आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिला सामना खेळताना दिसणार आहे.
याबरोबरच स्मिथने युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि महिपाल लोमरोरला बाहेर केले आहे. तर अँड्र्रयू टाय, रियान पराग आणि रॉबिन उथप्पाचे पुनरागमन झाले आहे. याव्यतिरिक्त हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरनेही अब्दुल समदच्या जागी विजय शंकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
आपल्या कॅन्सरग्रस्त वडीलांसाठी स्टोक्स मागील काही दिवस न्यूझीलंडमध्ये होता. त्यामुळे तो आयपीएल २०२० साठी उशीरा राजस्थान संघात दाखल झाला. याच कारणाने तो सुरुवातीचे काही सामने खेळला नव्हता. दिवसांपुर्वीच तो युएईला आयपीएल २०२० साठी आला आणि प्रोटोकॉलनुसार ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर आज हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन
जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), बेन स्टोक्स, रियान पराग, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन
डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, केन विलियम्सन, विजय शंकर, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, राशिद खान, संदिप शर्मा, खलील अहमद, टी नटराजन
महत्त्वाच्या बातम्या-
…आणि हार्दिक पंड्याने सचिनची भविष्यवाणी खरी करुन दाखवली
पाचव्या पराभवानंतर एमएस धोनीचा चेन्नई संघ झाला जोरदार ट्रोल; पाहा काही खास ट्विट्स
व्वा रे पठ्ठ्या! फक्त ३५ चेंडूत झळकावले शतक, ८ वर्षांनी ‘त्या’ विक्रमावर कोरले नाव
ट्रेंडिंग लेख-
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित