---Advertisement---

व्वा रे पठ्ठ्या! फक्त ३५ चेंडूत झळकावले शतक, ८ वर्षांनी ‘त्या’ विक्रमावर कोरले नाव

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2020 1:54 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा फलंदाज खुशदिल शाहने टी२० क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडला आहे. त्याने केवळ ३५ चेंडूत ताबडतोब शतकी खेळी केली आहे. त्याच्यापुर्वी टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरण्याचा विक्रम अहमद शहजादने केला होता. २०१२ साली केवळ ४० चेंडूत शतक ठोकत त्याने हा विक्रम केला होता. पण आता ८ वर्षांनंतर खुशदिलने त्याचा हा विक्रम मोडला आहे.

शुक्रवारी (९ ऑक्टोबर) पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय टी२० चषक स्पर्धेतील १६वा सामना झाला. या सामन्यात सिंध आणि दाक्षिण पंजाब संघ आमने-सामने आले होते. सिंधने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद २१६ धावांचा भलामोठा स्कोर उभारला होता. प्रत्युत्तरात पहिल्या ७ षटकांच्या आतच दाक्षिणात्त्य पंजाब संघाला मोठे धक्के बसले. त्यांचे ४ फलंदाज बाद झाले.

मात्र ५व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या खुशदिलने संघाचा डाव सावरला. त्याने केवळ ३५ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि ९ षटकार ठोकत १०० धावा केल्या. त्याच्या या अफलातून फलंदाजीमुळे संघाने २ विकेट्सने तो सामना जिंकला. सोबतच खुशदिल टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारा जगातील ५वा आणि पाकिस्तानातील पहिलाच फलंदाज ठरला.

टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने २०१३ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना हा विक्रम केला होता. त्यावेळी केवळ ३० चेंडूत त्याने शतकीय खेळी केली होती. तर या यादीत रिषभ पंत ३२ चेंडूसह शतक ठोकत दूसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केकेआरचा सुनिल नरेन अडकणार मोठ्या संकटात? गोलंदाजी ऍक्शनमुळे होऊ शकतो बॅन

RCB च्या भेदक माऱ्यापुढे CSK गपगार, बेंगलोरचा ३७ धावांनी विजय; चेन्नईचा पुढचा प्रवास खडतर

तुम तो छा गये भैया! युवराजच्या बॅटने आतापर्यंत २२० धावा कुटणारा ‘तो’ बनणार केकेआरचा कॅप्टन?

ट्रेंडिंग लेख-

फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा

आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---