आयपीएलच्या १३ व्या हंगामातील २५ वा सामना शनिवारी (१० ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. हा सामना बेंगलोर संघाने ३७ धावांनी जिंकला आणि या हंगामातील चौथा विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने धुव्वाधार फलंदाजी करत मोलाचे योगदान दिले. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाणेफेक जिंकून बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १६९ धावांचा डोंगर उभा केला. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत केवळ १३२ धावाच केल्या.
चेन्नई संघाकडून फलंदाजी करताना फलंदाज अंबाती रायडूने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ४० चेंडूंचा सामना करताना ४ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. त्याच्यासोबतच एन जगदीशननेही ३३ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. कर्णधार एमएस धोनीही १ षटकार मारत केवळ १० धावांवर झेलबाद झाला.
बेंगलोर संघाने जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन केले. बेंगलोरकडून ख्रिस मॉरिसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच वॉशिंग्टन सुंदरनेही २ विकेट्स घेतल्या, तर इसरू उदाना आणि फिरकीपटू युझवेंद्र चहलने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ५२ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ९० धावा केल्या. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच देवदत्त पडिक्कलने (३३) आणि शिवम दुबेने (२२) धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने १० धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
चेन्नईकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच दीपक चाहर आणि सॅम करनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
बेंगलोरच्या या विजयानंतर त्यांना दोन गुण मिळाले आहेत. आणि याचा त्यांना फायदा झाला असून ते पॉईंट टेबलमध्ये ८ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-तुम तो छा गये भैया! युवराजच्या बॅटने आतापर्यंत २२० धावा कुटणारा ‘तो’ बनणार केकेआरचा कॅप्टन?
-पंजाब संघामागची साडेसाती संपेना! ८.५ कोटींना टीममध्ये घेतलेल्या खेळाडूला झाली दुखापत
-ज्या धोनीच्या सीएसकेला नडला, त्याच धोनीशी राहुल त्रिपाठीचे आहे खास नाते
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
-आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित