मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमधील एक परिपुर्ण संघ म्हणून ओळखला जातो. या संघात फलंदाज, गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. मोठे फटके मारणारे फलंदाज, अतिशय कमी धावा देत विकेट्स घेणारे गोलंदाज व खऱ्या अर्थाने अष्टपैलू कामगिरी करणारे ऑलराऊंडर्स खेळाडू या संघात आहेत. असे असले तरी लसिथ मलिंगासारख्या दिग्गज गोलंदाजाच्या माघार घेण्यामुळे मुंबईला यावेळी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मुंबई इंडियन्सचे बरेचशे सामने हे आबु धाबीच्या स्टेडियमवर होणार आहे. अशातच येथील खेळपट्टी ही अतिशय संथ अर्थाच स्लो पीच म्हणून ओळखली जाते. यावेळी मुंबई संघाच्या अडचणींत भर पडली आहे.
भारतीय संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार खेळाडू क्विंटन डी कॉक हे मुंबई इंडियन्सचे दिग्गज सलामीवीर आहेत. गरज पडली तर ख्रिस लिन हा सुद्धा चांगला सलामीवीराचा पर्याय मुंबईकडे आहे.
सूर्याकुमार यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या व हार्दिक पंड्यासारखे खेळाडू मधल्या फळीला बळकट करतात. हे खेळाडू मोठी फटके खेळण्यात तरबेज आहेत. त्यामुळे इतर संघांच्या तुलनेत मुंबई इंडियन्स संघाचं पारडं जड असतं.
असं असलं तरी फिरकी गोलंदाजी मुंबई इडियन्ससाठी चिंतेची बाब असेल. कृणाल पंड्या एक पर्याय आहे. गेल्या हंगामात उत्तम प्रदर्शन करणाऱ्या राहुल चहरकडून या संघाला अपेक्षा असतील. फिरकीपटू जयंत यादवचा मागील हंगाम चांगला नव्हता, त्यामुळे तो या हंगामात किती सामने खेळेल हे पाहावे लागेल.
तसेच वेगवान गोलंदाजी विभागात मलिंगाच्या अनुपस्तिथीमुळे जसप्रीत बुमराहवर जास्त दबाव असेल. गेल्या हंगामात बुमराह संघाकडून सर्वाधिक 19 बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.
परदेशीं खेळाडूंबद्दल बोलायचं झाल, तर ट्रेंट बोल्ट आणि मिशेल मॅक्लेनघन हे डाव्या हाताने उत्तम वेगवान गोलंदाज करतात. नॅथन कुल्टर नाईल हा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. जेम्स पॅटिन्सनमुळे संघाच्या वेगवान गोलंदाजीला खोली येत आहे. संघात निवड होण्यासाठी या सर्वांमध्ये खडतर स्पर्धा होणार आहे.
टी२० स्टार कायरन पोलार्ड हा चार षटकं पुर्ण करण्याची क्षमता ठेवणारा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चार बळी घेऊन त्याने संघाला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, तो गेल्या काही हंगामात नियमित गोलंदाजी करत नाही. या 33 वर्षीय खेळाडूने मुंबई इंडियन्सकडून खेळताना गेल्या १० वर्षात १४६.७७ च्या स्ट्राइक रेटने २७५५ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स संघातर्फे सर्वाधिक षटकारही (१७६) पोलार्डच्याच नावावर आहे.
संघाचे प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने नुकत्याच एका मुलाखतीत रोहितच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. रोहितबद्दल बोलताना तो म्हणाला, “सहजतेने फलंदाजी करणाऱ्या या कर्णधाराला विरोधी संघाबद्दल अधिक माहिती गोळा करायला आवडते.”
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ-
रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिशेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, कुल्टर नाईल, प्रिंस राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट
महत्त्वाच्या बातम्या-
-कोल्हापूरच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन, भारताकडून खेळला होता केवळ १ कसोटी सामना
-माजी दिग्गज म्हणतो, ‘जर आरसीबी संघ आधीपासूनच संतुलित नव्हता, तर विराटने…’
-एक असा क्रिकेटर, जो आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारालाही राहू शकला नाही उपस्थित
ट्रेंडिंग लेख-
-सावंतवाडीचा नाईक युएईत षटकार चौकारांची बरसात करणार
-युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश
-आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…