---Advertisement---

आयपीएलमध्ये ‘या’ मैदानावर गोलंदाजी करण्यास घाबरत आहेत खेळाडू; जाणून घ्या काय आहे कारण

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 12:51 PM
---Advertisement---

मुंबई । तुम्हाला आठवत असेल की, 1990 च्या दशतकात जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये जवळपास दर वर्षी उत्साहपूर्ण सामने व्हायचे. याच मैदानावर सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिरंगी मालिकेत दोन शतके केली होती. सचिनच्या या दोन डावांना त्यावेळी ‘डेझर्ट स्टॉर्म’ असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी सचिनने ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न, डॅमियन फ्लेमिंग आणि मायकल कॅस्प्रेवेझ यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.

तब्बल दोन दशकांनंतर शारजाहमधील हे मैदान पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी आयपीएलमध्ये हे मैदान गोलंदाजांसाठी अनलकी ठरत आहे. आता परिस्थिती अशी आहे की, गोलंदाज येथे गोलंदाजी करण्यास घाबरतात.

आतापर्यंत 63 षटकारांचा पाऊस
या वेळी आयपीएलचे सामने युएईमधील तीन मैदानावर खेळले जात आहेत. यात दुबई, शारजाह आणि अबू धाबी ही मैदाने आहेत. यातील शारजाच्या मैदानावर आतापर्यंतच्या सामन्यात फलंदाजांनी वर्चस्व राखले आहे. आतापर्यंत येथे सर्वाधिक 63 षटकार ठोकले आहेत. 22 सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यातच एकूण 33 षटकार मारण्यात आले होते.  यानंतर 27 सप्टेंबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थानच्या सामन्यात एकूण 29 षटकार मारले गेले. राजस्थानचा सर्वात युवा फलंदाज संजू सॅमसनने या मैदानावर आतापर्यंत 13 षटकार लगावले आहेत.

प्रत्येक 7 व्या चेंडूवर षटकार
>> शारजाहमध्ये खेळाडू प्रत्येक 7 व्या चेंडूवर षटकार मारत आहेत.  तर अबू धाबीमध्ये प्रत्येक 22 चेंडूवर षटकार ठोकत आहेत. याशिवाय दुबईच्या मैदानावर फलंदाज प्रत्येक 19 चेंडूनंतर षटकार मारत आहेत.

>> शारजाहमध्ये धावांची सरासरी 10.88 आहे.  म्हणजेच प्रत्येक षटकात सुमारे 11 धावा केल्या जातात. इतर दोन मैदानावर असताना ही सरासरी 8 आहे.

>> शारजाहमध्ये आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये केवळ 21 विकेट पडल्या आहेत.

>> आतापर्यंत 882 धावा केल्या आहेत.  प्रत्येक सामन्यात संघ 200 धावांचे लक्ष्य देत आहेत.

छोटी सीमारेषा
क्रिकेट मैदानावर सहसा 70-80 मीटरची सीमारेषाअसते. पण शारजाह मधील सर्वात मोठी सीमारेषा फक्त 65 मीटर आहे.  एवढेच नाही तर जमिनीवरील काही भागात सीमारेषा केवळ 55 मीटर आहे.  अशा परिस्थितीत येथे गोलंदाजी करणे फार कठीण आहे. 1990 च्या दशकात दिल्लीचे फिरोजशाह कोटला मैदानही अशाच स्थितीत होते. 1996 च्या विश्वचषकात सनथ जयसूर्याने मनोज प्रभाकरची गोलंदाजी फोडून काढली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---