आयपीएल 2020 च्या लिलावाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. आयपीएलच्या या 13 व्या मोसमासाठी होणाऱ्या लिलावाच्या तयारीला सर्व संघांनी सुरुवात केली आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे.
या लिलावासाठी तब्बल 971 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये 713 भारतीय खेळाडू आणि 258 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
मात्र ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मिशेल स्टार्कने आयपीएल 2020 च्या मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पुढील व्यस्त वेळापत्रकाचा विचार करता आयपीएलमध्ये न खेळण्याचा हा निर्णय घेतला आहे.
29 वर्षीय स्टार्क आयपीएलमध्ये शेवटचे 2015 च्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून(आरसीबी) खेळला आहे. तसेच 2018 च्या आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 9.4 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले होते. मात्र तो दुखापतीमुळे या मोसमात खेळू शकला नाही. तर 2019च्या मोसमातूनही त्याने त्याचे नाव मागे घेतले होते.
स्टार्कबरोबरच इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रुटनेही 2020 आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असले तरी स्टार्कचे संघ सहकारी ग्लेन मॅक्सवेल, क्रिस लीन, पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड, मिशेल मार्श हे खेळाडू यावर्षी आयपीएल लिलावात उतरले आहेत. त्यांची मुळ किंमत 2 कोटी एवढी आहे. त्यांच्यासह डेल स्टेन, एंजलो मॅथ्यूज आणि क्रिस मॉरिस यांचीही मुळ किंमत 2 कोटी आहे.
स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीने सहाव्यांदा ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार पटकावत रचला इतिहास
वाचा????https://t.co/tUaIhtemZ1????#म #मराठी #Football @Mazi_Marathi @BeyondMarathi #BallonDor2019 #LionelMessi— Maha Sports (@Maha_Sports) December 3, 2019
वाढदिवस विशेष: क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक मार्क बाउचरबद्दल काही खास गोष्टी…
वाचा????https://t.co/6zdSVjzXpN????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #HappyBirthday #MarkBoucher— Maha Sports (@Maha_Sports) December 3, 2019






