आज 2020 आयपीएलसाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलावात आज 338 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत.
या लिलावाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने 2 मोठ्या खेळाडूंना संघात सामील करुन घेतले आहे. त्यांनी इंग्लंडचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनला संघात घेतले आहे. त्याच्यासाठी त्यांनी 5 कोटी 50 लाख रुपयांची किंमत मोजली आहे.
https://twitter.com/Maha_Sports/status/1207627313963139072
तसेच त्यानंतर त्यांनी भारताचा गोलंदाज पियुष चावलालाही खरेदी केले असून त्याच्यासाठी त्यांनी तब्बल 6 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली आहे. चावला आयपीएलमधील अनुभवी खेळाडू असून त्याने आत्तापर्यंत 157 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 584 धावा केल्या आहेत आणि 150 विकेट्स घेतल्या आहेत.
https://twitter.com/Maha_Sports/status/1207630368393707521
तसेच 21 वर्षीय सॅम करनने 2019 च्या मोसमातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याने या मोसमात खेळताना एक हॅट्रिकही घेतली आहे. तसेच त्याने 9 सामने खेळताना 10 विकेट्स घेतल्या आहेत.
3 वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईकडे सध्या या दोन खेळाडूंना खरेदी केल्यानंतर 2 कोटी 35 लाख रुपये खेळाडू खरेदीसाठी बाकी आहेत.






