आज 2020 आयपीएलसाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलावात 338 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये तमिळनाडूचा 24 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू शाहरुख खानला या लिलावात कोणत्याही संघाने पसंती दाखवलेली नाही. त्यामुळे तो अनसोल्ड राहिला आहे.
शाहरुख अनकॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला खेळाडू) खेळाडू असल्याने त्याची या लिलावासाठी 20 लाख ही मुळ किंमत होती.
त्याने आत्तापर्यंत 23 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 205 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 20 अ दर्जाचे तर 5 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 286 आणि 231 धावा केल्या आहेत.






