---Advertisement---

आयपीएल २०२०मध्ये दिसणार नाही जहीर खान!

On: गुरूवार, डिसेंबर 19, 2019 7:04 PM
---Advertisement---

आज 2020 आयपीएलसाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलावात 338 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये अफगाणिस्तानचा 21 वर्षीय क्रिकेटपटू जहीर खान पक्तिनला या लिलावात कोणत्याही संघाने पसंती दाखवलेली नाही. त्यामुळे तो अनसोल्ड राहिला आहे.

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले असल्याने त्याचा कॅप(किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू) खेळाडूंच्या यादीत समावेश होता. त्याची 50 लाख एवढी मुळ किंमत होती.

त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 कसोटी आणि 1 वनडे सामना खेळला असून यात अनुक्रमे 5 आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 41 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 51 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने 10 अ दर्जाचे आणि 14 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. यामध्ये अनुक्रमे त्याने 21 आणि 69 विकेट्स घेतल्या आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1207651568834629633

https://twitter.com/Maha_Sports/status/1207639865245847552

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---