मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा ड्वेन ब्राव्हो हा जगातील सर्वोत्कृष्ट टी20 अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. गोलंदाजी असो की फलंदाजी, संघासाठी दोन्ही मार्गांनी योगदान देण्यात किती सक्षम आहे हे त्याच्या आकडेवारीवरून लक्षात येते. 20 पेक्षा जास्त फ्रेंचायझी संघांकडून खेळताना, टी20 मध्ये 500 हून अधिक बळी आणि जवळपास 6500 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो मागील 9 वर्षांपासून चेन्नई संघाचा एक भाग आहे. 2011 मध्ये, लिलावात चेन्नईने बोली लावून त्याला त्याच्या संघात सामील केले. यावर्षी वेस्ट इंडीजकडून संघाच्या लिलावात विकण्यात येणारा ब्राव्हो एकमेव खेळाडू होता. ख्रिस गेलसारख्या स्फोटक फलंदाजालाही लिलावात फ्रँचायझींनी विकत घेतले नव्हते.
टी20 मधील सर्वाधिक बळीचा विक्रम
टी20 क्रिकेटमध्ये 454 सामन्यात 506 विकेट घेण्याचा विक्रम ब्राव्होच्या नावावर आहे. या प्रकारात 500 बळी घेणारा ब्राव्हो पहिला गोलंदाज आहे. ब्राव्हो हा एकमेव टी20 चा बादशहा आहे. ब्राव्होनंतर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 390 बळी घेतल्या आहेत. तिसर्या क्रमांकावर वेस्ट इंडीजच्या सुनील नरेनचे नाव आहे, त्याने 385 बळी घेतल्या आहेत.
टी20 मध्ये ब्राव्होच्या धावा
2006 पासून टी20 क्रिकेट खेळत असलेल्या ब्राव्होने आतापर्यंत 20 वेगवेगळ्या फ्रँचायझीसाठी खेळताना 465 सामन्यांत 6324 धावा केल्या आहेत. त्याने 20 वेळा अर्धशतकीय खेळी केली आहे. 70 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
चेन्नईसाठी मोठा विक्रम नोंदवेल
या हंगामात ब्राव्हो चेन्नईकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरू शकतो. आर. अश्विनचा विक्रम मोडण्यापासून तो 3 विकेट दूर आहे. अश्विनने चेन्नईकडून एकूण 120 बळी घेतले. ब्राव्होने 103 सामन्यांत 118 विकेट्स घेतल्या आहेत आणि तीन विकेट घेतल्यानंतर अश्विनला मागे टाकेल. इतकेच नव्हे तर ब्राव्होने आतापर्यंतच्या या स्पर्धेत 147 बळी घेतले असून अजून तीन बळी घेतल्यास त्यांचे 150 बळीही पूर्ण होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले
-आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला…
-काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय
ट्रेंडिंग लेख-
-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी