यावर्षी आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून १० नोव्हेंबरदरम्यान यूएईत होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने यूएईतील आबू धाबी, दुबई आणि शारजाह या तीन शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. बीसीसीआयला यूएईत आयपीएलचे आयोजन करण्यासाठी भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. अशामध्ये कमीत कमी ५० युवा क्रिकेटपटूंना आयपीएलच्या ८ फ्रंचायझी संघांबरोबर नेट गोलंदाज म्हणून यूएईला जाण्याची संधी मिळू शकते.
फलंदाजांना सराव करण्यासाठी संघ आपल्यासोबत युवा गोलंदाजांना घेऊन जाण्यासाठी योजना तयार करत आहेत. युवा गोलंदाजांना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यांसारख्या फलंदाजांना नेटमध्ये सरावादरम्यान गोलंदाजी करण्याची संधी मिळेल.
चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या आयपीएलच्या ३ फ्रंचायझी संघांंनी याची पुष्टी केली आहे. या तिन्ही संघांनी नेट गोलंदाजांची निवड प्रक्रिया सुरु केली आहे.
संघ नेट गोलंदाजांची यादी तयार करत आहे
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मंगळवारी (११ ऑगस्ट) बोलताना म्हटले, “आम्ही यूएईमध्ये सराव सत्रांसाठी १० गोलंदाजांना घेऊन जाण्याची योजना तयार करत आहोत. ते गोलंदाज संघासोबत असतील आणि स्पर्धा सुरु होईपर्यंत ते सोबत राहतील.”
केकेआरनेही पुष्टी केली आहे की, त्यांच्यासोबतही १० नेट गोलंदाज यूएईला जातील. मुंबईचा माजी कर्णधार आणि केकेआरचा अकादमी प्रशिक्षक अभिषेक नायर गोलंदाजांची निवड करणार आहे. दिल्ली कॅपिटल्सही आपल्यासोबत ६ गोलंदाजांना आपल्या यादीत समाविष्ट करत आहे, जे संघाचा भाग असतील, तर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघही आपल्या अकादमीतून नेट गोलंदाजांसाठी यादी तयार करत आहे.
रणजी आणि १९ तसेच २३ वर्षांखालील संघात खेळलेल्या युवा गोलंदाजांना मिळणार संधी
फ्रंचायझी संघांनी रणजी ट्रॉफी खेळेल्या आणि १९ वर्षांखालील तसेच २३ वर्षांखालील संघात खेळलेल्या क्रिकेटपटूंना आपल्यासोबत जोडण्याची तयारी सुरु केली आहे. काही संघ अशा युवा गोलंदाजांची यादी तयार करत त्यांची कामगिरी तपासत आहे, जे आयपीएलच्या लिलावात बीसीसीआयच्या यादीत सामील होते. परंतु त्यांना कोणत्याही फ्रंचायझींनी आपल्या संघात घेतले नाही.
संघ ज्यूनियर खेळाडू आणि लोकल गोलंदाजांना नेट गोलंदाज म्हणून द्यायचे संधी
भारतात आयपीएलच्या आयोजनादरम्यान फ्रंचायझी संघ ज्यूनियर खेळाडू आणि लोकल गोलंदाजांनाच सराव सत्रात फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी देत असायचे. तरीही यावेळी आयपीएलचे आयोजन यूएईत होत आहे.
यूएईत जैव- सुरक्षित वातावरणात स्पर्धेचे आयोजन होत आहे. अशामध्ये लोकल गोलंदाजांना सुरक्षेच्या कारणात्सव संधी देणे कठीण होईल. त्यामुळे संघांना जैव- सुरक्षित वातावरणात बनविण्यात आलेले प्रोटोकॉल लक्षात घेता भारतातूनच नेट गोलंदाजांना यूएईला घेऊन जायचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-केवळ धोनीने सांगितल्यामुळे ‘या’ क्रिकेटरने खेळला होता २०११ सालचा विश्वचषक
-वडील ख्रिस ब्रॉड यांनी शिक्षा सुनावल्याबद्दल स्टुअर्ट ब्रॉड म्हणतोय, आता ते…
ट्रेंडिंग लेख-
-भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
-कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज
-४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला