शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) आयपीएल २०२० च्या ४१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला १० धावांनी पराभूत केले. हा मुंबईचा या हंगामातील सातवा विजय होता. मुंबईविरुद्ध पराभव मिळाला असला, तरी चेन्नईचा संपूर्ण संघ कमी धावसंख्येवर पराभूत होण्यापासून वाचल्यानंतर त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ट्रोल केले आहे.
झाले असे की, चेन्नईने युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि एन जगदीशनला मुंबईविरुद्धच्या सामन्यात संधी दिली होती. परंतु त्यांना या संधीचा फायदा घेता आला नाही. ते शून्य धावा करत पव्हेलियनमध्ये परतले. इतर अनुभवी फलंदाजही नियमित अंतराने तंबूत परतले. चेन्नईच्या आयपीएल इतिहासात असे पहिल्यांदाच झाले होते की, पावर प्लेमध्ये चेन्नईने आपले पहिले ५ विकेट्स गमावले होते.
अवघ्या ८.५ षटकात चेन्नईची धावसंख्या ७ विकेट्स ४७ अशी होती. आयपीएलमध्ये ७ विकेट्स गमावून केलेली ही सर्वात कमी धावसंख्या होती. परंतु चेन्नईने जसे ५० आकडा पार केला, तसे त्यांनी ट्विटरवर बेंगलोर संघाला ट्रोल केले.
चेन्नईने बेंगलोरच्या या धावांचा उल्लेख करत त्यांना ट्रोल केले. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “कमीत कमी ४९ धावा करण्यापासून वाचलो.”
At least, the 49 fiasco was averted. 🙈😭#WhistlePodu #Yellove #WhistleFromHome #CSKvMI
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 23, 2020
खरं तर बेंगलोर संघाने आयपीएल इतिहासात सर्वात कमी धावसंख्या केली होती. त्यांनी २०१७ साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना ४९ धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाज करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ईडन गार्डन्सवर १३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बेंगलोर संघाची फलंदाजी फळी पत्त्यांच्या पानाप्रमाणे ढासळली. त्यांच्या संघाचा पूर्ण डाव ४९ धावांवर संपुष्टात आला होता.
चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत ११४ धावाच केल्या. यामध्ये केवळ सॅम करनने सर्वाधिक ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली.
मुंबईकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. सोबतच जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त कुल्टर- नाईलने १ विकेट आपल्या खिशात घातली, तर फलंदाजी करताना मुंबईकडून इशान किशनने
चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून इशान किशन (६८) आणि क्विंटन डी कॉक (४६) धावा केल्या.
विशेष म्हणजे रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे या सामन्यात कायरन पोलार्डने संघाचे नेतृत्त्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-धावा करण्यात मागे पडलेली सीएसके विक्रमांत मात्र आघाडीवर, पाहा काय केलाय विक्रम
-राहिलेल्या ३ मॅच खेळणार का? पाहा काय होते धोनीचे उत्तर
-‘जिंकणारा संघ नव्हे हा तर वृद्ध कल्याण केंद्र’, माजी क्रिकेटरची सीएसकेवर बोचरी टीका
ट्रेंडिंग लेख-
-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला