मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुबई येथे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा ४७ वा सामना होणार आहे. या सामन्यात दिल्ली संघ हैदराबादला पराभूत करत प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल. कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला आता १६ गुण मिळवण्यासाठी केवळ २ गुणांची आवश्यकता आहे. हे गुण मिळवताच ते गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान होतील.
दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वातील हैदराबाद संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले असून ते ८ गुण मिळवत गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरित सामने जिंकावे लागतील. यासोबतच त्यांना चांगला रनरेटही बनवावा लागेल.
दिल्ली संघाकडे आक्रमक फलंदाजी आणि मजबूत गोलंदाजी फळी आहे. ते आपल्या केवळ एका खेळाडूवर अवलंबून नाहीत. कारण वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. परंतु मागील ३ महिन्यात शिखर धवनला सोडले, तर दिल्लीच्या इतर फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शतक ठोकत संघाला विजय मिळवून देणाऱ्या धवनने पंजाबविरुद्धच्या सामन्यातही सलग शतक ठोकले. परंतु इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
शनिवारी (२४ ऑक्टोबर) कोलकाताच्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग रकताना दिल्लीच्या फलंदाजांना केवळ १३९ धावाच करता आल्या. सलामी फलंदाज पृथ्वी शॉच्या जागी अजिंक्य रहाणे सलामीला फलंदाजीस पाठवले. परंतु त्यालाही खातं खोलता आले नाही. रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांनाही चांगली खेळी करता आली नाही.
गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (२३ विकेट्स) आणि एन्रीच नॉर्किएने (१४ विकेट्स) चांगली कामगिरी केली आहे. तुषार देशपांडे आणि आर अश्विन यांनीही नुकत्याच झालेल्या सामन्यात चुका केल्या. परंतु अक्षर पटेलने उत्तम गोलंदाजी केली.
सनरायझर्स हैदराबाद संघ या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध मिळालेल्या मागील पराभवाची भर काढण्यासाठी उतरेल. त्यांना मागील सामन्यात १२७ धावांच्या छोट्या आव्हानाचा सामना करता आला नाही. सलामी फलंदाज वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोच्या बाद झाल्यामुळे सामन्याचे चित्र पालटले होते.
हैदराबाद संघ फलंदाजीत वॉर्नर, बेयरस्टो आणि मनीष पांडेवर अधिक अवलंबून आहे. विजय शंकरनेही राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. परंतु पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याला खास कामगिरी करता आली नव्हती.
जेसन होल्डरला संघात सामील केल्यामुळे आता संघाची गोलंदाजी फळी चांगलीच मजबूत झाली आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.
हैदराबादने यापूर्वीच्या सामन्यातही दिल्ली संघाला पराभूत केले आहे. आता आजच्या सामन्यात हैदराबाद संघ कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहितने ट्विटर, इंस्टाग्राम बायोमधून काढला ‘इंडियन क्रिकेटर’ टॅग, यामागे नक्की कारण काय?
-“जस्टिस फॉर सुर्यकुमार यादव”, टीम इंडियात संधी न मिळाल्याने चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
-रोहित शर्माची आयपीएलमधून माघार? मुंबई इंडियन्सने दिली महत्त्वाची माहिती…
ट्रेंडिंग लेख-
-कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
-आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल