आयपीएलच्या दूसऱ्या सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचा (सीएसके) वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने आयपीएलच्या तेराव्या हंगामाविषयी मोठे विधान केले आहे. या हंगामात त्याला सीएसकेकडून खेळायला मिळण्याची अपेक्षा आहे. I Will Get Some Matches For CSK In IPL 2020
आयपीएल २०२० लिलावात हेजलवुडला सीएसकेने २ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो आता ऑस्ट्रेलिया संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. विशेष म्हणजे, हेजलवुडने तब्बल ४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळले आहे. यापुर्वी त्याने २०१६सालच्या टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता.
एका व्हर्युअल परिषदेत एएनआयच्या प्रश्नांची उत्तरे देत हेजलवुड म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा टी२० क्रिकेट सामना खेळून खूप चांगले वाटले. खूप दिवसांपासून मी ऑस्ट्रेलियाकडून टी२० सामना खेळला नव्हता. मी बिग बॅश लीगमध्ये काही सामने खेळले होते. मी काही गोष्टींवर काम केले, ज्या माझ्यासाठी चांगल्या सिद्ध होत आहेत. आशा आहे की, चेन्नईकडून खेळताना या हंगामात मला काही सामन्यात संधी मिळेल. जेव्हाही मला संधी मिळेल, तेव्हा मी चेन्नईसाठी उत्तमोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेन.”
आयपीएल २०२०मध्ये खेळत असताना हेजलवुडला भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेला समजण्याचीही संधी मिळणार आहे. यामुळे जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल, तेव्हा त्याला या गोष्टीचा फायदा होईल. याविषयी बोलताना हेजलवुडने म्हटले की, “काही भारतीय खेळाडूंसोबत खेळणे खूप रोमांचक असणार आहे, जे उन्हाळ्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येतील. ही माझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. आयपीएल हा एक वेगळा प्रकार आहे, पण मी भारतीय खेळाडूंना थोडाफार तरी जाणून घेऊ शकेल.”
हेजलवुडने आतापर्यंत आयपीएलमध्ये पदार्पण केले नाही. हा त्याचा पहिलाच आयपीएल हंगाम ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
सरकारने घेतले दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड ताब्यात, नक्की काय आहे प्रकरण
शाहरुखचा त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघ बनला चौथ्यांदा सीपीएल चॅम्पियन; जाणून घ्या आत्तापर्यंतचे विजेते
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो यंदा करु शकतो चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण?
ट्रेंडिंग लेख –
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
आयपीएलच्या सर्व ८ संघांच्या सपोर्टिंग स्टाफची संपूर्ण माहिती, घ्या जाणून






