आयपीएलमध्ये गुरुवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने किंग्स इलेव्हन पंजाबला 69 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाबला केवळ 132 धावा करता आल्या. आपण या लेखात पंजाबच्या पराभवाची 5 कारणे पाहाणार आहोत.
• खराब गोलंदाजी पंजाबच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण आहे. मागील सामन्याप्रमाणे या सामन्यातही पंजाबच्या गोलंदाजांनी निराश केले. हैदराबादचे सलामीवीर डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली.
• पंजाबचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने 4 षटकांत 40 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आणि त्याने 3 षटकांत 33 धावा दिल्या. मुजीब उर रहमाननेही 4 षटकांत 39 धावा दिल्या. मॅक्सवेलने 2 षटकांत 26 धावा दिल्या. परिणामी, पंजाब संघासमोर 202 धावांचे मोठे आव्हान होते.
• खराब गोलंदाजीनंतर पंजाबच्या फलंदाजांनीही खराब कामगिरी केली. सलामीवीर मयंक अगरवाल 9 धावांवर धावबाद झाला. कर्णधार राहुलला 16 चेंडूत 11 धावा करता आल्या. मॅक्सवेलने 7 तर मनदीप सिंगने 6 धावा केल्या. युवा फलंदाज निकोलस पुरनच्या 37 चेंडूत 77 धावांच्या खेळीमुळे पंजाबला 132 धावा करता आल्या. त्याच्याव्यतिरिक्त पंजाबचे सर्व फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले.
• खराब संघ निवड पंजाबच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. पंजाबचा संघ हैदराबादविरुद्ध 6 फलंदाजांसह उतरला होता. फिरकीपटू मुजीब उर रहमान 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मुजीब हा तळातील फलंदाज आहे. इतर संघांमध्ये खेळाडू 8 व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करू शकतात. पंजाब संघात हे मुळीच पाहायला मिळाले नाही.
• कर्णधार म्हणून केएल राहुल पुन्हा अपयशी ठरला. तो आपल्या गोलंदाजांचा योग्य वापर करू शकला नाही. या सामन्यात राहुलला वेगवान फलंदाजीही करता आलेली नाही. हे सुद्धा पराभवाचे एक कारण आहे.






