---Advertisement---

…म्हणून केकेआरने ख्रिस लिनला सोडले, खुद्द कर्णधाराने सांगितले कारण

On: शनिवार, ऑगस्ट 29, 2020 9:54 PM
---Advertisement---

ख्रिस लिन हा टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आयपीएल, बिग बॅश आणि इतर व्यवसायिक टी२० लीगमध्ये आपल्या उत्तुंग षटकारांनी व आक्रमक खेळ्यांनी त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. कोणत्याही व्यवसायिक संघाला ख्रिस लिनसारखा तडाखेबंद फलंदाज आपल्या संघात ठेवायला आवडेल. मात्र, डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल २०२० लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने लिन याला करारमुक्त केले होते. आता, स्वतः केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याने लिनला संघातून वगळण्याचे कारण सांगितले आहे.

संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर एक व्हिडिओ टाकत दिनेश कार्तिकने या मागील कारणे सांगितली आहेत. कार्तिक म्हणाला, “ख्रिस लिन एक सर्वोत्तम टी२० फलंदाज आहे यात शंका नाही आणि त्याने संघासाठी अमूल्य योगदान दिले होते. पण, आता तो संघाच्या नवीन रणनीतीचा भाग होऊ शकला नाही. लिन सर्वांना हवाहवासा वाटणारा खेळाडू आहे. त्याला सोडण्याचा निर्णय व्यवस्थापनाने काळजावर दगड ठेवून घेतला होता.”

लिलावामध्ये सहभागी झाल्यानंतर लिनला दोन कोटी या आधारभूत किमतीत मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले होते. याआधी, डेक्कन चार्जर्स व कोलकाता नाइट रायडर्ससाठी आपले कौशल्य दाखवणाऱ्या लिनला‌, १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबईसाठी सलामी करताना आपण पाहू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनी कितीही ग्रेट असला तरी हॉल ऑफ फेममध्ये सामील व्हायला पहावी लागणार या कारणामुळे वाट

असा परफेक्ट फलंदाज मी तरी पाहिला नाही, गावसकरांनी केले ‘या’ क्रिकेटरचे जोरदार कौतूक

सुरेश रैनाने माझ्यासाठी जे- जे केलं तसं दुसरं कुणी कुणासाठी करु शकत नाही

ट्रेंडिंग लेख –

बापरे! तुमची लाडकी मुंबई इंडियन्स युएईत रहाते अतिशय महागड्या हॉटेलात, एका दिवसाचे भाडे…

एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा

आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२० विश्वचषक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---