---Advertisement---

बलाढ्य दिल्ली संघावर कोलकाताचा मोठा विजय; वरुण चक्रवर्ती ठरला विजयाचा शिल्पकार

---Advertisement---

शनिवारी (२४ ऑक्टोबर) अबु धाबी येथे आयपीएल २०२०च्या ४३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला ५९ धावांनी पराभूत केले. हा कोलकाताचा या हंगामातील सहावा विजय होता. कोलकाताच्या विजयाचा हीरो वरुण चक्रवर्ती ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत कोलकाताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने ६ विकेट्स गमावत १९४ धावा केल्या. कोलकाताने दिलेल्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाने ९ विकेट्स गमावत १३५ धावा केल्या.

दिल्लीकडून फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३८ चेंडूत ५ चौकार ठोकत ४७ धावा कुटल्या. त्याच्यासोबतच यष्टीरक्षक रिषभ पंतनेही २७ धावांचे योगदान दिले. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज २० धावांच्या आतच तंबूत परतले.

कोलकाता संघाकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने अविश्वसनीय कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनेही ३ विकेट्स घेतल्या, तर लॉकी फर्ग्युसननेही एक विकेट आपल्या खिशात घातली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून धडाकेबाज नितीश राणाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५३ चेंडूंचा सामना करताना ८१ धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने १ षटकार आणि १३ चौकार ठोकले. त्याच्यासोबतच अष्टपैलू सुनील नरेननेही ३२ चेंडूत ६४ धावांची अफलातून खेळी केली. यामध्ये ४ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. यांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.

दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना एन्रीच नॉर्किए, कागिसो रबाडा आणि मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

हा सामना जिंकत कोलकाताने २ गुण मिळवले. या गुणांचा फायदा घेत कोलकाता संघ गुणतालिकेत १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-‘सुपर’ थरार!! कोलकाताच्या फर्ग्युसनने हैदराबादच्या जबड्यातून खेचला विजय

-हैदराबादला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाताला तब्बल ११ वर्षांनी सुपर ओव्हरमध्ये यश

-तूच रे पठ्ठ्या! कोलकाताच्या धुरंदराने केली धोनीच्या ७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी

ट्रेंडिंग लेख

-आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे

-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’

-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---