---Advertisement---

IPL 2020 : मुंबई विरुद्ध पंजाब संघातील आजच्या सामन्यात ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी, पहा संभाव्य अकरा खेळाडू

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 4:04 PM
---Advertisement---

मुंबई । आयपीएल 2020 मध्ये गुरुवारी (1ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. अबूधाबीच्या मैदानावर होणार्‍या या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. यापूर्वी झालेल्या सामन्यामध्ये, दोन्ही संघांना आपआपल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सध्या दोन गुणांसह पॉईंट टेबलमध्ये पंजाब पाचव्या आणि मुंबई सहाव्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात अंतिम अकरा जणांचा संघ कसा असू शकेल यावर एक नजर टाकूयात.

मुंबई इंडियन्स:

मुंबईचे स्टार खेळाडू अद्याप लयीत नाहीत. त्याची गोलंदाजीही कमकुवत दिसत आहे. अशा परिस्थितीत पंजाबविरूद्ध काही बदल होऊ शकतात.  संघासाठी क्विंटन डीकॉक आणि रोहित शर्मा पुन्हा डावाची सुरवात करताना दिसू शकतील.  सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या हेदेखील मधल्या फळीत खेळणार आहेत.  गोलंदाजीत राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह हेदेखील आजचा सामना खेळू शकतील. तथापि, नॅथन कूल्टर नाईलला जेम्स पॅटिन्सनची जागा घेण्याची संधी मिळू शकेल.

फलंदाज: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन

यष्टिरक्षक : क्विंटन डी कॉक

अष्टपैलू: हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या

गोलंदाज: राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, नॅथन कूल्टर नाईल

किंग्ज इलेव्हन पंजाब:

संघाचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अगरवाल चांगल्या फॉर्मात आहेत आणि पुन्हा सलामीला खेळताना दिसू शकतात.  त्याचवेळी मधल्या फळीची जबाबदारी करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, जेम्स नीशम, सरफराज खान यांच्यावर अवलंबून आहे.  गोलंदाजीत रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रोल हे देखील खेळताना दिसू शकतील.

फलंदाज: मयंक अगरवाल, करुण नायर, सरफराज खान, निकोलस पुरन

यष्टिरक्षक : केएल राहुल

अष्टपैलू: ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम

गोलंदाज: रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रोल

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---