fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईच्या ‘या’ पाच खेळाडूंमुळे कोलकाता संघाला पाहावे लागले पराभवाचे तोंड

September 24, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने आपला पहिला विजय मिळविला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पराभवातून सावरल्यानंतर मुंबईने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली. अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने केकेआरचा 49 धावांच्या फरकाने पराभव केला. रोहितच्या नेतृत्वात मुंबई संघाने कार्तिकच्या केकेआरवर प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व राखले.

मुंबईच्या या विजयात काही खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान राहिले. अशाच ६ खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.

रोहित शर्मा:

केकेआरविरुद्ध आपला शानदार फॉर्म कायम ठेवत रोहितने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी केली. रोहितच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा पाऊस पडला. त्याने फक्त 54 चेंडूत 80 धावा केल्या. या दरम्यान रोहितने तीन चौकार आणि सहा षटकार लगावले.  त्याने सूर्यकुमार यादवबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 90 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली. तसेच त्याने मैदानात संघाचे नेतृत्व करताना चांगले निर्णय घेतले. त्याने आपल्या गोलंदाजांचा चांगला उपयोग करुन घेतला.

सूर्यकुमार यादवः

पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवची बॅट दुसऱ्या सामन्यात चालली. त्याने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करत अवघ्या 28 चेंडूत 47 धावा फटकावल्या.  या दरम्यान त्याने सहा चौकार आणि एक षटकारही लगावला. धावबाद होण्यापूर्वी यादवने रोहितबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

जसप्रीत बुमराहः

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या जुन्या रंगात दिसत होता.  त्याने आपल्या सटीक आणि धोकादायक गोलंदाजीने कोलकाताच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. बुमराहने त्याच्या षटकात धोकादायक आंद्रे रसेलला प्रथम माघारी धाडले आणि त्यानंतर ओएन मॉर्गनला तीन चेंडूनंतर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.  बुमराहच्या या षटकाने सामन्याचा नूर पूर्णपणे पलटला.  त्याने चार षटकांत 32 धावा देऊन दोन बळी घेतले.

कायरन पोलार्ड:

अष्टपैलू कायरन पोलार्डने सुरुवातीपासून तीन्ही क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने सात चेंडूंमध्ये 13 धावा केल्या आणि नाबाद राहिला. त्यानंतर पोलार्डने तीन षटकांत 21 धावा देऊन एक गडी बाद केला. तसेच शुबमन गिलचा महत्त्वपूर्ण झेल घेतला.

ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन

या चौघांशिवाय ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन यांनीही शानदार गोलंदाजी केली.  बोल्ट आणि पॅटिन्सन या दोघांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले.


Previous Post

पंजाब-आरसीबी आज येणार आमनेसामने; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

Next Post

‘या’ खेळाडूला वरच्या क्रमांकावर संधी द्यायची होती, सीएसकेच्या पराभवानंतर प्रशिक्षकाने दिली प्रतिक्रिया

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@DelhiCapitals
IPL

फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Next Post

‘या’ खेळाडूला वरच्या क्रमांकावर संधी द्यायची होती, सीएसकेच्या पराभवानंतर प्रशिक्षकाने दिली प्रतिक्रिया

श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि....

आज रंगणार बेंगलोर विरुद्ध पंजाब सामना, जाणून घ्या 'या' सामन्याबद्दल सर्वकाही

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.