आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत काही अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. केवळ एका षटकारानेही सामन्याचे चित्र बदलताना आपण पाहिले आहे. या हंगामातही षटकारांचा पाऊस पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही दिग्गज फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. परंतु या हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि टी20 चा स्टार फलंदाज कायरान पोलार्ड यांच्यासारखे दिग्गज जास्तीत जास्त षटकार मारण्याच्या शर्यतीत मागे पडले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारले आहेत ते आपण पाहूया.
सर्वाधिक षटकारांच्या शर्यतीत या वेळी किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज निकोलस पूरन आहे. त्याने आतापर्यंत 16 षटकार ठोकले आहेत. परंतु वाईट बाब म्हणजे त्याच्या संघाला या हंगामात काही खास कामगिरी करता आलेली नाही.
राजस्थानचा सलामीवीर संजू सॅमसन या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. सुरुवातीच्या सामन्यात धावांचा वर्षाव करणाऱ्या सॅमसनने आतापर्यंत 16 षटकार ठोकले आहेत.
राजस्थानला विजय मिळवून देणारा अष्टपैलू राहुल तेवतियानेही आतापर्यंत 15 षटकार ठोकले आहेत. त्याने पंजाबविरुद्ध एका षटकात पाच षटकारही ठोकले आहेत.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत 14 षटकार ठोकले आहेत. मॅरेथॉन डाव खेळणारा रोहित कोणत्याही सामन्यात कोणत्याही क्षणी षटकारांचा वर्षाव करू शकतो.
सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत मुंबईचा युवा फलंदाज ईशान किशनही रोहितसह संयुक्तरीत्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 5 डावांमध्ये 14 षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट, मग काय झालं नक्कीच पाहा
-भल्या- भल्यांवर ठरली विराट- डिविलियर्सची जोडीच वरचढ, गाठला पहिला नंबर
-विराट-डिविलियर्सच्या जोडीला तोडंच नाही, ‘या’ जोड्यांना मागे टाकत रचलाय खास विक्रम
ट्रेंडिंग लेख-
-“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?