मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट क्वॉलिफायर सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. हा मुंबई इंडियन्स संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा बोल्टच्या अंतिम सामन्यात खेळण्याबद्दल आशावादी आहे.
आयपीएलच्या अंतिम फेरीत सहाव्यांदा प्रवेश करताना गुरुवारी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्लसवर ५७ धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीच्या भक्कम फलंदाजीला भगदाड पाडण्याचे काम ट्रेंट बोल्टने केले होते. त्याने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणेला शून्य धावेवर बाद केले. यातून दिल्लीचा संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही.
मात्र बोल्टने यानंतर आणखी एक षटक टाकले व दुखापतग्रस्त झाला. त्याने २ षटकांत ९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यामुळे मुंबईला या सामन्यात एकूण ६ गोलंदाज वापरावे लागले. सामन्यातील १४व्या षटकात groin injury मुळे बोल्टला मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो मैदानात परतलाच नाही.
“मी त्याला पाहिले आहे. मला तो ठीक वाटला. मला नाही वाटत की बोल्टची दुखापत तेवढी मोठी आहे. तीन दिवसांची विश्रांती घेऊन तो नक्कीच कमबॅक करेल,” असे सामना संपल्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बोल्ट तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४ सामन्यात १९.४१च्या सरासरीने २२ विकेट्स घेतल्या आहे. तर अव्वल स्थानी बोल्टचाच संघसहकारी जसप्रीत बुमराह असून त्याने २७ तर दुसऱ्या स्थानावर २५ विकेट्ससह कागिसो रबाडा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL – मुंबई इंडियन्स सहाव्यांदा फायनलमध्ये दाखल; दिल्लीविरुद्ध मिळवला दणदणीत विजय
-मुंबई इंडियन्स सगळ्यांनाच नडली, पण ‘ही’ दोन ठिकाणं कर्णधार रोहितलाच नडली
-मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार का सलामीची जागा ?
ट्रेंडिंग लेख-
-‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!