दुबई। आयपीएल २०२० च्या हंगामातील प्लेऑफला सुरुवात झाली असून क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना मुंबईने ५७ धावांनी जिंकला. या सामन्यात दिल्लीने मुंबईला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मुंबईच्या फलंदाजीला मात्र खास सुरुवात झाली नाही. तरीही मुंबई इंडियन्सने २० षटकांअंती शानदार ५ बाद २०० धावा केल्या होत्या.
अपेक्षेप्रमाणे मुंबईकडून या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डिकॉक सलामीला आले होते. परंतु रोहितला दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गोल्डन डकवर बाद केले. त्यानंतर ११.५ षटकांत मुंबईने ३ विकेट्स गमावून १०० धावा केल्या होत्या. तत्पूर्वी मुंबईचा संघ धावा करताना चाचपडतानाही दिसत होता.
असे असताना पुढे सुर्यकुमार यादव, इशान किशन व हार्दिक पंड्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने शानदार ५ बाद २०० धावा केल्या. यात सूर्यकुमार यादवने ३८ चेंडूत ५१ धावा, इशान किशनने ३० चेंडूत ५५ धावा व हार्दिक पंड्याने १४ चेंडूत ३७ धावा केल्या. हार्दिकने १४ चेंडूतील ५ चेंडूवर तर षटकार मारला होते. इशान किशनने ४ चौकार व ३ षटकारांची बरसात केली. तर सुर्यकुमारने ६ चौकार व २ षटकार मारले.
मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२०मध्ये ज्याप्रमाणे साखळी फेरीचे खेळला, त्याचप्रमाणे त्यांनी प्ले ऑफचीही सुरुवात केली. सलामीची जोडी लवकर फुटल्यावर तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूने चांगली कामगिरी केली. त्यानंतर पुढेही कृणाल पंड्या शुन्य धावेवर बाद झाल्यावर मधल्या फळीतील व खालच्या फळीतील फलंदाजांनी बाजू सांभाळून नेली.
संपूर्ण स्पर्धेत मुंबईकडून जेव्हा जेव्हा वेळ आली, तेव्हा सर्वच स्थानावरील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अगदी संघ दबावात असतानाही फलंदाजांनी धावफलक हलता ठेवत सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्स सगळ्यांनाच नडली, पण ‘ही’ दोन ठिकाणं कर्णधार रोहितलाच नडली
-IPL – मुंबई इंडियन्स सहाव्यांदा फायनलमध्ये दाखल; दिल्लीविरुद्ध मिळवला दणदणीत विजय
-मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार का सलामीची जागा ?
-“रोहितची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी घेण्यात गैर नाही”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत
-संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-






