आयपीएल २०२० कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. याचा फटका आयपीएल फ्रंचायझींना बसला आहेच. मात्र, राजस्थान रॉयल्स संघाला त्याहूनही मोठा धक्का बसला आहे. काल (१६ मार्च) राजस्थान संघातील वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओशेन थॉमसचा जमैकामध्ये कार अपघात झाला आहे.
त्यामुळे त्याला जमैकाच्या रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, “थॉमसची कार दुसऱ्या एका कारबरोबर धडकली आणि उलटी पडली. त्यामुळे थॉमस बेशुद्ध झाला होता. त्याला रुग्णालयात नेतेवेळी शुद्ध आली. पण, अजूनही त्याला कितपत दुखापत झाली आहे हे कळलेले नाही.”
थॉमस हा राजस्थान संघातील दुसरा गोलंदाज आहे, ज्याला दुखापत आली आहे. त्याच्यापुर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरलाही दुखापत झाली होती.
वेस्ट इंडीजच्या खेळाडू असोसिएशनने (डब्ल्यूआयपीए) थॉमसला लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ‘कार अपघातात वेस्ट इंडिजच्या फलंदाजासोबत दुर्घटना घडल्याचे आम्हाला दुख: आहे. असोसिएशनच्या सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.’
Be Fast, Be Lethal, Be OT!
Was that the #WednesdayWisdom our bowling coach @SteffanJones105 shared with Oshane Thomas? 🧐 #HallaBo pic.twitter.com/iJYH4ZiKl7
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 15, 2019
त्याने २०१८मध्ये गुवाहाटी येथील भारताविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. थॉमसने वेस्टइंडिज संघाकडून २० वनडे आणि १० टी२० सामने खेळले आहेत. यावेळी त्याने एकूण ३६ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय, थॉमसने जानेवारीमध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचा सामना खेळला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
– रोखठोक: …तरीही मांजरेकरांचे कौतुक करणं क्रमप्राप्त
– एकही धाव न करता, हातात साधी बॅटही न घेता स्मिथ-वाॅर्नरची टीम झाली…
– पृथ्वी शाॅ- श्रेयस अय्यर जोडीचा तुफान डान्स होतो व्हायरल, चाहते…