---Advertisement---

आयपीएलमधील या दोन संघाचे गमतीशीर संभाषण पाहिले का?

On: शनिवार, नोव्हेंबर 16, 2019 11:44 AM
---Advertisement---

पुढीलवर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम होणार आहे. या मोसमाआधी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. पण त्याआधी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांचे खेळाडू मुक्त करण्याची तसेच खेळाडूंचे दुसऱ्या संघांशी ट्रेडिंग करण्याची मुदत होती. त्यानुसार अनेक संघांनी त्यांचे काही खेळाडू दुसऱ्या संघात ट्रान्सफर केले.

याचधर्तीवर एका चाहत्याने सोशल मीडियावर राजस्थान रॉयल्स संघाला प्रश्न विचारला की ते त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला देणार का?

https://twitter.com/thorking14/status/1194887152888213504

यावर राजस्थाननेही गमतीशीर उत्तर दिले. राजस्थानने या चाहत्याला उत्तर दिले की ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तूम्ही विराट कोहली आणि एबी डिविलिअर्सचे ट्रेडिंग करायला तयार आहात का?’

यावर बेंगलोरनेही मजेशीर उत्तर दिले. बेंगलोरने ट्विट केले की ‘तूम्हाला आमचा मिस्टर नॅग्स मिळू शकतो. आम्हाला माहित आहे तो आमच्याकडे परत येण्याचा मार्ग नक्की शोधेल.’

मिस्टर नॅग्स हा बेंगलोर फ्रँचायझीमधील एक सदस्य असून तो संघातील अनेक गुपिते सांगत असतो. तसेच खेळाडूंच्या गमतीशीर मुलाखती घेत असतो. विनोदी कलाकार दानिश सेट हा मिस्टर नॅग्सच्याच्या भुमिका निभावतो.

आयपीएल 2020 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकाता येथे होणार आहे.

लिलावाआधी दुसऱ्या संघात शामील झालेले खेळाडू –

मयंक मार्कंडे (मुंबई इंडियन्समधून दिल्ली कॅपिटल़ आणि दिल्ली कॅपिटल्समधून राजस्थान रॉयल्स) – 20 लाख

शेर्फेन रुदरफोर्ड (दिल्ली कॅपिटलमधून मुंबई इंडियन्स) –

रविचंद्रन अश्विन (किंग्ज इलेव्हन पंजाबमधून दिल्ली कॅपिटल) –

जगदेश सुचित (दिल्ली कॅपिटलमधून किंग्ज इलेव्हन पंजाब) –

ट्रेंट बोल्ट (दिल्ली कॅपिटलमधून मुंबई इंडियन्स) –

कृष्णाप्पा गॉथम (राजस्थान रॉयल्समधून किंग्ज इलेव्हन पंजाब) –

अंकित राजपूत (किंग्ज इलेव्हन पंजाबमधून राजस्थान रॉयल्स) –

धवल कुलकर्णी (राजस्थान रॉयल्समधून मुंबई इंडियन्स) –

अजिंक्य रहाणे (राजस्थान रॉयल्समधून दिल्ली कॅपिटल) –

मयंक मार्कंडे (दिल्ली कॅपिटलमधून राजस्थान रॉयल्स) –

राहुल तेवतिया (दिल्ली कॅपिटलमधून राजस्थान रॉयल्स) –

सिद्धेश लाड (मुंबई इंडियन्समधून कोलकता नाईट रायडर्स)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---