---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात फील्डिंग कोच मोहम्मद कैफने या खेळाडूचे केले खास स्वागत!

---Advertisement---

2020 आयपीएलमध्ये आता अनुभवी गोलंदाज आर अश्विन आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळताना दिसणार आहे. दिल्लीने त्याला प्लेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून संघात स्थान दिले आहे. त्याचबरोबर दिल्ली संघात प्रवेश केल्यानंतरअश्विनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अश्विनने ट्विट करुन म्हटले आहे की, ‘किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर माझ्या काही चांगल्या आठवणी आहेत. मला माझ्या सर्व खेळाडू मित्रांची खूप आठवण येत राहिल . मी दिल्ली कॅपिटलच्या संघात सामील होण्यासाठी आणि आयपीएलच्या पुढच्या सत्राची उत्सुकतेने वाट पाहत आहे.’

दिल्ली कॅपिटलसचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनीही ट्वीट करत अश्विनचे संघात स्वागत केले आहे.

दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचे क्रिकेट संचालक आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही अश्विनवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘अश्विन संघाचा एक भाग राहणे आमच्यासाठी महत्वाचे होते. पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. या हंगामाच्या लिलावात आम्ही आमचा संघ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू. किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ 13 व्या मोसमात संतुलित असावा अशी आमची इच्छा आहे.’

जगदीश सुचितच्या बदल्यात दिल्लीने अश्विनला खरेदी केले. अश्विन दिल्लीकडून खेळणार असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स किंग्स इलेव्हन पंजाबला 1.5 कोटी रुपये देणार आहे.

तसेच अश्विनला दिल्ली कॅपिटल्सकडून 2020 आयपीएलसाठी 7.6 कोटी रुपये मिळतील, जे त्याचे 2018 चे लिलाव मूल्य आहे. रविचंद्रन अश्विनसाठी दिल्ली आयपीएलमधील चौथा संघ असेल. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्ज, राइझिंग पुणे सुपरगिजंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---