कोरोना व्हायरसमुळे यावर्षीची आयपीएल २०२० स्पर्धा युएईत आयोजिक केली जात आहे. या स्पर्धेने आपला अर्धा प्रवास पूर्ण केला आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंसह त्यांचे कुटुंब नाही. खरं तर आयपीएलमध्ये दरवर्षी खेळाडूंचे कुटुंब त्यांच्यासोबत असतात आणि प्रवास करतात. परंतु कोरोना व्हायरसमुळे हे यावर्षी शक्य होऊ शकले नाही. असे असूनही काही खेळाडूंचे कुटुंब त्यांच्या आणि संघाच्या समर्थनासाठी सोबत आहेत. अशामध्येच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या बाबतीतही आहे.
आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर चहल एकटाच युएईला आला होता. परंतु आता स्पर्धेचा अर्धा प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्याला एक चांगलीच भेट मिळाली. त्याची होणारी पत्नी आणि डान्सर धनश्री वर्मा चहलला आणि बेंगलोर संघाचे समर्थन करण्यासाठी युएईला आली आहे.
धनश्री युएईत केवळ संघाला पाठिंबा देत नाही, तर ती युएईची मजाही घेत आहे. तिने आपल्या डान्सचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे.
धनश्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. यासोबत ती आपल्या डान्सचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते. अशातच तिने पुन्हा एकदा आपल्या डान्सचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. धनश्रीच्या डान्सचा हा व्हिडिओ खास आहे. कारण तिने कुठे मॅटवर किंवा स्टेजवर नाही, तर दुबईच्या समुद्र किनाऱ्यावरील मातीमध्ये डान्स केला आहे.
तिने टोनी कक्करच्या ‘नाच मेरी लैला’ या गाण्यावर डान्स केला आहे. धनश्रीच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CGt2nACJr7v/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वीही धनश्री वर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आपल्या चाहत्यांसाठी ‘बुर्झ खलिफा’ चॅलेंज दिले होते. या व्हिडिओत ती हॉटेलच्या बालकनीमध्ये उभी राहून बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि कियारा आडवाणीच्या ‘लक्ष्मी बाँब’ या चित्रपटातील ‘बुर्झ खलिफा’ गाण्यावर डान्स करत होती. यासोबतच तिने आपल्या चाहत्यांना ‘बुर्झ खलिफा’ चॅलेंज देत म्हटले होते की, त्यांनी देखील आपले डान्स मूव्हज दाखवावे.
https://www.instagram.com/p/CGpeY8lJZ5J/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएल २०२० मध्ये बेंगलोर संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांनी सुरुवातीचे सामने गमावले. परंतु पुढे चांगली कामगिरी करत स्पर्धेत पुनरागमन केले. सध्या ते गुणतालिकेत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-अर्धशतक किंग! २० वर्षीय पडिक्कलने ‘या’ दिग्गजांना मागे टाकत मिळवली आघाडी, पाहा काय केलाय पराक्रम
-फिर से ‘हिट मॅन’! राजस्थानविरुद्ध अर्धशतक ठोकताच रोहितच्या नावावर होणार मोठा विक्रम
-विक्रमवीर पांडे! हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकत मनीषने केला ‘खास’ विक्रम, वाचा सविस्तर
ट्रेंडिंग लेख-
-चौकारांशिवाय अर्धशतक…!! आयपीएलमध्ये या ५ फलंदाजांनी केलाय हा कारनामा
-आयपीएल२०२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारे ४ खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी