---Advertisement---

राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट

On: शनिवार, ऑक्टोबर 31, 2020 6:20 PM
---Advertisement---

शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या सामन्यात राजस्थानने 7 गडी राखून पंजाबला पराभूत केले. या सामन्यात राजस्थानच्या धुरंदरांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळेच राजस्थानला पंजाबवर विजय मिळवण्यात यश आले.

आयपीएलच्या 13व्या हंगामातील 50 व्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान आमने सामने आले होते. पंजाबने 20 षटकांत 4 गडी गमावून 185 धावा उभ्या केल्या. यात ख्रिस गेल च्या 99 धावा आणि राहुलच्या 46 धावांचा समावेश होता. हा सामना जिंकणे राजस्थानसाठी मोठे आव्हान होते. परंतु ‘करो या मरो’ची वेळ असल्याने राजस्थानने 7 गडी राखून पंजाबचा विजयी रथ रोखून धरला.

राजस्थानच्या या पाच खेळाडूंनी मिळवून दिला संघाला विजय

1. बेन स्टोक्स

अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने पुन्हा एकदा आपला उत्तम खेळ केला. मनदीप सिंगचा उत्तम झेल घेत त्याने सामन्यातील आपले पहिले योगदान क्षेत्ररक्षणातून आपल्या संघाला दिले. यानंतर गोलंदाजीस उतरत 4 षटकांत 32 धावा देऊन कर्णधार केएल राहुल व निकोलस पूरनला बाद केले. यानंतर मिळालेल्या 186 धावांचा पाठलाग करताना स्टोक्सने 25 चेंडूंत अर्धशतक झळकावले व त्यानंतर तो बाद झाला.

2. संजू सॅमसन

राजस्थानचा उपकर्णधार यष्टीरक्षक संजू सॅमसनने 24 चेंडूंत महत्वपूर्ण 48 धावा केल्या. चार चौकार व तीन षटकार मारून तो धावबाद झाला. परंतु त्यापूर्वीच त्याने त्याचे काम पूर्ण केले होते.

3. जोफ्रा आर्चर

राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी केली. संपूर्ण 4 षटकांत त्याने मात्र 26 धावा दिल्या. मनदीपला शून्यावर तर ख्रिस गेल ला 99 धावांवर त्याने बाद केले. आर्चरने घेतलेल्या दोन्ही विकेट्स मध्ये एका धावेला खूप महत्त्व होते. एक धाव मनदीपला मिळाली असती, तर त्याच्या गळ्यात भोपळा पडला नसता.

4. स्टीव्ह स्मिथ

मागील अनेक सामन्यांत कर्णधार स्टीव्ह स्मिथची बॅट अतिशय शांत होती. मात्र पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपल्या खेळात पुनरागमन होत असल्याचे दाखवून दिले आहे. त्याने धावांचा पाठलाग करताना पाच चौकार देखील ठोकले. स्मिथने 20 चेंडूंत नाबाद 31 धावा करून संघाला शेवटपर्यंत उभे राहत विजय मिळवून दिला.

5. जॉस बटलर

यष्टीरक्षक जॉस बटलरने देखील स्टीव्ह स्मिथसोबत शेवटपर्यंत उभे राहत 11 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. या खेळात त्याने एक चौकार आणि दोन षटकार लगावले.

ट्रेंडिंग लेख-

-सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार

-…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला

-IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश

महत्वाच्या बातम्या-

-दुष्काळात तेरावा महिना ! हैदराबादचा ‘हा’ स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

-‘हा’ खेळाडू बनू शकतो तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू, गंभीरची भविष्यवाणी

-कमाल लाजवाब राहूल! आयपीएलमध्ये अनोखी कामगिरी करत विराट कोहलीच्या विक्रमाची केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---