शनिवारी (१७ ऑक्टोबर) दुबई येथे झालेल्या आयपीएल २०२० च्या ३३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने राजस्थान रॉयल्स संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. या हंगामातील बेंगलोरचा हा सहावा विजय होता. बेंगलोरच्या विजयाचा हीरो यष्टीरक्षक एबी डिविलियर्स ठरला. त्याला सामनावीर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
नाणेफेक जिंकून राजस्थान संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७७ धावा केल्या. राजस्थानने दिलेले हे आव्हान बेंगलोर संघाने १९.४ षटकात ३ विकेट्स गमावत १७९ धावा करत पूर्ण केले.
बेंगलोरकडून फलंदाजी करताना डिविलियर्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २२ चेंडू खेळत १ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची तडाखेबंद अर्धशतकी खेळी केली. सोबतच कर्णधार विराट कोहली (४३) आणि सलामीवीर ऍरॉन फिंचने (३५) धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त इतर फलंदाज २० धावांच्या आतच तंबुत परतले.
राजस्तान संघाकडून गोलंदाजी करताना श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतियाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्तानकडून कर्णधार स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३६ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ६ चौकार ठोकत ५७ धावा कुटल्या. सोबतच सलामीवीर रॉबिन उथप्पा (४१) आणि जॉस बटलरने (२४) धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना ख्रिस मॉरिसने खतरनाक गोलंदाजी केली. त्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त युझवेंद्र चहलनेही २ विकेट्स आपल्या खिशात घातल्या.
या विजयासह बेंगलोर संघाला २ गुण मिळाले आहे. या गुणांचा फायदा घेत बेंगलोर संघ १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-बेंगलोरच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा; कोलकातावर ८२ धावांनी धमाकेदार विजय
-राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची चिंता मिटली; संघांना मिळाले प्रायोजक
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…