---Advertisement---

आयपीएल २०२०ची तारीख ठरली, पण संघ पडले चिंतेत, जाणून घ्या कारण

On: मंगळवार, डिसेंबर 31, 2019 12:58 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल) 2020 च्या मोसमाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 13 व्या मोसमाचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 2019च्या आयपीएलचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने मिळवल्याने ते 2020च्या मोसमाची त्यांच्या घरच्या मैदानावर सुरुवात करतील.

दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने आयएएनएसशी बोलताना सांगितले की, आयपीएलचा हा 13 वा मोसम सुरु होण्याची तारीख 29 मार्च निश्चित करण्यात आली आहे. “मला सांगण्यात आले आहे की आयपीएल 2020चा मोसम मुंबईत 29 मार्चपासून सुरू होईल,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

त्यामुळे जर 29 मार्च ही तारिख निश्चित झाली असेल तर याचा अर्थ असा होतो की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघातील काही खेळाडूंना आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागेल.

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) हे संघ या काळात 3 टी20 सामने खेळणार आहेत. तर इंग्लंड (England) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघ 2 कसोटी सामने खेळणार आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड टी20 मालिका 29 मार्च रोजी संपेल. तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस 31 मार्च आहे.

याच कारणामुळे एका फ्रांचायझीच्या अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की त्यांना आशा आहे की, गव्हर्निंग काऊंसिल आपल्या जुन्या आयपीएलच्या मोसमांप्रमाणे जाईल. ज्यामध्ये डबल हेडर असायचे आणि आयपीएलचा हंगाम 1 एप्रिलच्या आसपास सुरू होत होतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---