---Advertisement---

हे मल्ल्या उठा ले! आरसीबीचा स्वप्नभंग झाल्यानंतर चाहती लागली ढसाढसा रडायला; Video व्हायरल

On: रविवार, नोव्हेंबर 8, 2020 10:05 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० च्या हंगामातील एलिमिनेटर सामना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) अबु धाबीत झाला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळण्यात आला. या सामन्यात हैदराबादने बेंगलोरला ६ विकेट्सने पराभूत केले.  या पराभवामुळे बेंगलोर संघाला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. यावेळी एका चाहतीला राहवले नाही ती चक्क रडू लागली. त्यामुळे रडणाऱ्या चाहतीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, नाणेफेक जिंकत हैदराबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत बेंगलोरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १३१ धावा केल्या होत्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता होती. यावेळी बेंगलोरचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी गोलंदीज करत होता. त्याने पहिला चेंडू हैदराबादचा फलंदाज केन विलियम्सनला टाकला. त्यावर विलियम्सनने १ धाव घेतली आणि आपले अर्धशतक झळकावले.

त्यानंतर दुसरा चेंडू जेसन होल्डरने खेळला. त्यावर त्याला धाव घेता आली नाही. परंतु त्याने पुढच्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यामुळे आता संघाला ३ चेंडूत केवळ ४ धावांची आवश्यकता होती. यावेळी होल्डरनेही चौथ्या चेंडूवरही चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

यावेळी हैदराबादने विजय मिळवल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. ज्यात बेंगलोर संघ पराभूत झाल्यामुळे एक चाहती मोठ मोठ्याने रडताना दिसत आहे. या व्हिडिओला ‘हे मल्ल्या उठा ले’ असे कॅप्शन दिले आहे.

या विजयासह हैदराबादने क्वॉलिफायर २ सामन्यात उडी घेतली. आता क्वॉलिफायर २ सामन्यात हैदराबाद संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-…आणि मनीष पांडेने केली विराट कोहलीची बोलती बंद, पाहा व्हिडिओ

-बाप-लेकाचा गोंडस क्षण! आपल्या चिमुकल्यासोबत खेळण्यात हार्दिक पंड्या दंग; पाहा व्हिडिओ

-नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ

ट्रेंडिंग लेख-

-भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

-‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक

-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---