---Advertisement---

IPL 2020 : आज हैदराबाद-राजस्थान आणि दिल्ली-मुंबई येणार आमने सामने, पाहा सामन्याबद्दल सर्वकाही

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2020 11:57 AM
---Advertisement---

आयपीएलध्ये रविवारी (11 ऑक्टोबर) दोन सामने खेळले जाईल. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता दुबईत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये रात्री 7.30 वाजता दुसरा सामना होईल.

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादने या हंगामात खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत. हा संघ गुणतालिकेत 6 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्याचबरोबर राजस्थानने स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती, पण सलग 4 सामने गमावल्यानंतर हा संघ 7 व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हैदराबाद विरुद्ध जिंकणे एक आव्हान असेल.

दिल्ली-मुंबई सामन्यातील विजयी संघ पोहोचेल अव्वल स्थानी 

रात्री दिल्ली आणि मुंबई आमने सामने येतील. हा सामना जिंकून दिल्लीला प्ले-ऑफच्या दिशेने एक पाऊल टाकण्यास दिल्ली सज्ज असेल. त्याचवेळी दिल्लीला नमवून गुणतालिकेत शीर्षस्थानी जाण्याची संधी मुंबईकडे असेल. सध्या ६ सामन्यांपैकी ५ सामने जिंकून दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर मुंबई ६ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हैदराबाद-राजस्थानचे महागडे खेळाडू

हैदराबादचा सर्वात महागडा खेळाडू डेविड वॉर्नर आहे. एका हंगामात त्याला 12.50 कोटी रुपये मिळतात. त्यानंतर मनीष पांडे (11 कोटी) दुसरा महागडा खेळाडू आहेत. त्याचबरोबर कर्णधार स्मिथ राजस्थानमधील सर्वात महागडा खेळाडू असून त्याची किंमत १२.50 कोटी रुपये आहे आणि संजू सॅमसनची किंमत 8 कोटी रुपये आहे.

मुंबई-दिल्लीतील महागडे खेळाडू

कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू आहे. संघ त्याला हंगामात 15 कोटी रुपये देतो. त्याच्यानंतर हार्दिक पंड्याचा क्रमांक येतो त्याला एका हंगामात 11 कोटी मिळतील. त्याचबरोबर, रिषभ पंत हा दिल्लीचा सर्वात महागडा खेळाडू असून त्याची किंमत 15 कोटी रुपये आणि शिमरॉन हेटमायरची किंमत 7.75 कोटी रुपये आहे.

खेळपट्टीबद्दल माहिती आणि हवामान अहवाल

दुबई आणि अबुधाबीमधील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहील. दुबईत तापमान 25 ते 37 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. त्याचबरोबर अबूधाबीतील तापमान 26 ते 35 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते.

दुबईमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. त्याचबरोबर अबू धाबीमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल. दुबईमध्ये आयपीएलपूर्वी झालेल्या 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55.74% आहे. त्याचबरोबर अबूधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या मागील 44 टी -20 सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 56.81% आहे.

दुबई मधील खेळपट्टीवरील सामन्यांबद्दलची आकडेवारी

या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने : 61
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 144
दुसर्‍या डावात सरासरी धावसंख्या: 122

अबूधाबीच्या खेळपट्टीवरील सामन्यांबद्दलची आकडेवारी

या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने : 44
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 19
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 25
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 137
दुसर्‍या डावात सरासरी धावसंख्या: 128

हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर राजस्थानपेक्षा आहे अधिक

लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर 53.50% आहे. हैदराबादने आतापर्यंत एकूण 114 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 61 सामने जिंकले आहेत आणि 53 गमावले आहेत. त्याचवेळी राजस्थानचा विजय मिळवण्याचा दर 50.66% आहे. राजस्थानने आतापर्यंत एकूण 153 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 77 जिंकले आहेत आणि 74 गमावले आहेत. 2 सामने अनिर्णित होते.

दिल्लीपेक्षा मुंबईचा विजय मिळवण्याचा दर आहे अधिक

लीगमध्ये मुंबईने आतापर्यंत एकूण 193 सामने खेळले आहेत. यात त्याने 113 जिंकले आहेत आणि 80 गमावले आहेत. मुंबईचा विजय मिकावण्याचा दर 58.29% आहे. त्याचबरोबर आतापर्यंत खेळलेल्या एकूण 183 सामन्यांपैकी दिल्लीने 82 सामने जिंकले आहेत आणि 99 सामने गमावले आहेत. 2 सामने अनिर्णित होते. दिल्लीचा विजय मिळवण्याचा दर 45.02% आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ख्रिस मॉरिसचा अचूक थ्रो आणि चेन्नईचा ‘तो’ फलंदाज सरळ तंबूत, पाहा

केकेआरचा सुनिल नरेन अडकणार मोठ्या संकटात? गोलंदाजी ऍक्शनमुळे होऊ शकतो बॅन

RCB च्या भेदक माऱ्यापुढे CSK गपगार, बेंगलोरचा ३७ धावांनी विजय; चेन्नईचा पुढचा प्रवास खडतर

ट्रेंडिंग लेख-

फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा

आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---