भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा असा विश्वास आहे की, चेन्नई सुपर किंग्जमध्ये (सीएसके) युवा खेळाडूंचा अभाव त्यांच्या विजेतेपदामध्ये अडथळा ठरू शकतो. हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनी तीन वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या सीएसकेमधून वैयक्तिक कारणे सांगून माघार घेतली आहे. मुंबईनंतर चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव आयपीएल संघ आहे ज्यांनी तीन वेळा विजेतेपद जिंकले आहे.
तसेच आयपीएलच्या इतिहासातील चेन्नई सुपर किंग्ज एकमेव संघ आहे जो प्रत्येक वेळी अंतिम ४ संघात पोहोचला आहे. २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये चेन्नईने एमएस धोनीच्या नेतृत्वात आयपीएल विजेतेपदही जिंकले आहे.
सुनील गावस्कर यांनी चेन्नईच्या संभाव्यतेबद्दल सांगितले की, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या अनुपस्थितीमुळे संघात मोठी पोकळी निर्माण होईल. या दिग्गजांची जागा घेणे सोपे होणार नाही. पण युवा खेळाडू या निमित्ताने आपली उपस्थिती दर्शवू शकतात.
ते स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार म्हणाले , “कोणत्याही चांगल्या आयपीएल संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे संतुलन असावे. चेन्नईत असे युवा खेळाडू आहेत का, जे संघाचा स्थर उचलू शकतात? हा मोठा प्रश्न आहे. मला वाटतं यामुळेच चेन्नईला अडचणींचा सामना करावा लागतो.”
सुनील गावस्करने मुरली विजयला डाव सुरू करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, अंबाती रायुडू आणि धोनी ३ व ४ नंबरवर खेळू शकतात. गावस्कर यांनी धोनीच्या स्वभावाचे कौतुकही यावेळी केले. पण ते म्हणाले की रैनासारखी क्षमता असणारे खेळाडू फार कमी आहेत.
ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीवर कोणताही दबाव नाही. यामुळे त्याची कामगिरी सुधारू शकते. सुरेश रैना आयपीएलचा मास्टर आहे. तो कोणत्याही संघात संतुलन साधू शकतो. चेन्नई त्याला नक्कीच मिस करेल. १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२० संघ-
एमएस धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसी, इम्रान ताहिर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिशेल सॅटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सॅम करन, पियुष चावला, जोश हेजलवुड आणि आर साई किशोर