इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम शेवटच्या टप्पात आहे. साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर प्ले ऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाशी सामना करेल. तर शुक्रवारी पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल. या सामन्याआधी आपण दोन्ही संघांबद्दल महत्वपूर्ण माहिती पाहाणार आहोत.
हैदराबादने साधली विजयाची हॅट्रिक, तर बेंगलोरने गमावले 4 सामने
स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. सलग चार सामने गमावल्यानंतर बेंगलोरची गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरण झाली होती. दुसरीकडे हैदराबादने विजयाची हॅटट्रिक केली आहे. मागील तीन सामन्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबईविरुद्धच्या ‘करो अथवा मरो’ असलेल्या सामन्यात या संघाने 10 गडी राखून विजय मिळवला होता.
वॉर्नर आणि साहा आहेत हैदराबादची मजबूत बाजू
हैदराबादच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय कर्णधार डेविड वॉर्नर आणि यष्टीरक्षक वृद्धीमान साहा या सलामी जोडीला जाते. दोघांनी दिल्लीविरुद्ध 107 आणि मुंबईविरुद्ध 151 धावांची भागीदारी केली. वॉर्नरने आतापर्यंत 14 सामन्यांत 529 धावा केल्या आहेत. साहाने तीन सामन्यांत 184 धावा केल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करत साहाने हे सिद्ध केले की संघ व्यवस्थापनाने त्याला सुरुवातीला संघात स्थान न देऊन मोठी चुकी केली होती.
हैदराबादची गोलंदाजी संतुलित
हैदराबादची गोलंदाजीही मजबूत आहे. हैदराबादकडे भारतीय संदीप शर्मा, जेसन होल्डर, शाहबाज नदीम, टी नटराजन आणि रशिद खान हे प्रतिभावान गोलंदाज आहेत. युवा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अखेरच्या षटकांत टी नटराजननेही चांगली गोलंदाजी केली आहे. मधल्या षटकांत रशिदनेही किफायतशीर गोलंदाजी केली आहे.
बेंगलोरला कामगिरीत करावी लागेल सुधारणा
दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगलोरला त्यांच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. सलग चार सामने गमावल्यानंतर संघाचा आत्मविश्वास ढासळला आहे. कर्णधार कोहली मागील सामन्यातील कामगिरी विसरून पुढील तीन सामने जिंकून खिताब नावावर करण्यावर लक्ष केंद्रीत करेल.
बंगलोरचे फलंदाज ठरले फ्लॉप
दिल्लीविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात बंगलोरच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. अनुभवी फलंदाज ऍरॉन फिंचच्या जागी ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जोशुआ फिलिपला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने चांगली फलंदाजी केली असली तरी त्याला अद्याप मोठी खेळी करता आली नाही. युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स यांना उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.
नवदीप सैनी पुनरागमन करण्याची शक्यता
बंगलोरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर दुखापतीमुळे मागील सामना न खेळणारा नवदीप सैनी या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज, इसुरू उडाना, ख्रिस मॉरिस वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल हे दोन फिरकी गोलंदाज संघात असतील.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलिअर्स, पार्थिव पटेल, ऍरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, इसुरु उडाना, शिवम दुबे , उमेश यादव, गुरकीरतसिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, अॅडम झाम्पा.
सनरायझर्स हैदराबाद:
डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत गोस्वामी, विराट सिंग, प्रियांम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलन, पृथ्वीराज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टेनलेक, टी नटराजन, बासिल थंपी.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: …आणि त्याने चेंडू खाली पडूच दिला नाही; पाहा राहुल चाहरने घेतलेला अवघड झेल
“जो आया हैं, वो जायेगा भी” मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीची उडतेय खिल्ली; पाहा भन्नाट मीम्स
क्वालिफायर सामन्यानंतर पर्पल कॅप बुमराहच्या डोक्यावर तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठे बदल