---Advertisement---

विराटच्या RCB विरुद्ध विजय मिळवण्याचे श्रेय अय्यरने दिले ‘या’ खेळाडूंना

On: मंगळवार, नोव्हेंबर 3, 2020 9:59 AM
---Advertisement---

सोमवारी(२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच आयपीएल २०२० च्या गुणतालिकेत दुसरा क्रमांकही दिल्लीने पटकावला. या विजयानंतर आनंदी असलेला दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजांचे कौतुक केले आहे. याबरोबरच त्याने या सामन्यात कोणती गोष्ट त्यांच्या संघाला फायदेशीर ठरली, हे देखील सांगितले आहे.

सामन्यानंतर अय्यर म्हणाला, ‘ज्याप्रकारे कामगिरी झाली, त्याबद्दल आनंदी आहे. आम्हाला माहित आहे हा ‘करो या मरो’ चा सामना होता. पण आमचे लक्ष केवळ विजयावर होते, नेट रनरेटकडे नव्हते. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या संघांनी विजय मिळवले त्यांनी पूर्ण समीकरणच बदलवून टाकले. नक्कीच हा खूप स्पर्धात्मक हंगाम राहिला आहे.’

तसेच गोलंदाजांना चांगल्या कामगिरीचे श्रेय देताना श्रेयस म्हणाला, ‘मला वाटते की गोलंदाजांनी योजना खुप चांगल्या प्रकारे राबवल्या. त्यांना माहित होते की त्यांना काय करायचे आहे. नॉर्किएने खरंच चांगली कामगिरी केली. हॉटेलमध्ये आम्ही काही सत्र घेतले ज्यात आम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या बळकट आणि कमजोर बाजूंचे विश्लेषण केले आणि मला वाटते त्याचा आम्हाला फायदा झाला. ‘

आता दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आली असल्याने त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या २ संधी उपलब्ध असतील. त्यांचा प्लेऑफमध्ये गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध क्वालिफायर १ चा सामना होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर २ चा सामना खेळावा लागेल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्याबद्दल श्रेयस म्हणाला, ‘मुंबई हा स्पर्धेतील सर्वोत्तम संघापैकी एक संघ आहे. आम्हाला गोष्टी सरळ आणि साध्या ठेवाव्या लागतील, याचबद्दल आम्ही आमच्या बैठकीत चर्चा केली आहे. मुलभूत गोष्टी बदलायच्या नाहीत. आपण जितके गोष्टी साध्या ठेवू तितक्या त्या सोप्या होतात.’

असा झाला बेंगलोर विरुद्ध दिल्ली सामना –

सोमवारी झालेल्या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना देवदत्त पड्डीकलच्या(५०) अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ७ बाद १५२ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी विराट कोहली(२९), एबी डिविलियर्स(३५) अशा फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश मिळवले. दिल्लीकडून एन्रीच नॉर्किएने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच कागिसो रबाडाने २ आणि आर अश्विनने १ विकेट घेतली.

तसेच १५३ धावांचा पाठलाग करत असताना दिल्लीकडून शिखर धवन आणि अजिंक्य राहाणे यांनी अर्धशतकी खेळी केल्या. शिखरने ४१ चेंडूत ५४ धावांची तर रहाणेने ४६ चेंडूत ६० धावांची खेळी केली. तसेच या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारीही केली. त्यामुळे दिल्लीला १९ षटकात १५३ धावांचे आव्हान सहज पार करता आले.

बेंगलोरकडून गोलंदाजीत शाहबाज अहमदने २ विकेट्स तर मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने

धोनी आयपीएल २०२१मध्ये करेल ४०० धावा, दिग्गज क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी

आयपीएल २०२०मध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ५ खेळाडू, ज्यांना बोली लावताना थरथरतील फ्रंचायझींचे हात

ट्रेंडिंग लेख-

‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…

IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---