---Advertisement---

आयपीएल२०२० : आरसीबीच्या या ३ खेळाडूंना कदाचित मिळणार नाही एकाही सामन्यात खेळण्याची संधी

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा आयपीएलचा असा संघ आहे ज्यात प्रत्येक आयपीएल हंगामात उत्तमोत्तम खेळाडू असतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने यावर्षी देखील दर्जेदार खेळाडूंची मोट बांधली आहे. पहिल्या हंगामापासून आरसीबी संघात अनेक दिग्गज खेळाडू खेळले असले तरी, संघाला अजूनपर्यंत विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदा युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांना संघाकडून मोठ्या आशा आहेत.

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ऍरॉन फिंच यासारख्या तुफानी फलंदाजांनी सजलेल्या या संघात फलंदाजांची फळी अतिशय मजबूत आहे. या संघाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सक्षम आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही बरीचशी मोठी नावे संघात सामील आहेत. या अनेक बड्या खेळाडूंमुळे काही प्रतिभावान खेळाडूंना या पूर्ण हंगामात बाकांवर बसावे लागू शकते.

अशाच, तीन खेळाडूंविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे कदाचित या हंगामात एकही सामना खेळू शकणार नाही.

१) पवन देशपांडे

कर्नाटकसाठी घरगुती क्रिकेट खेळणाऱ्या पवन देशपांडे याला या हंगामात वीस लाखांच्या रकमेत आरसीबीने विकत घेतले आहे. घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार करणार्‍या या खेळाडूमध्ये क्षमतेचा अभाव नाही. संधी मिळाल्यास हा फिरकीपटू आपली उपयोगिता सिद्ध करू शकतो, परंतु आरसीबीच्या संघात आधीपासूनच अनेक दिग्गज आणि मोठी नावे आहेत, त्यामुळे कदाचित या युवा खेळाडूला संधी मिळणार नाही. पवन संपूर्ण हंगाम बाकांवर घालवण्याची दाट शक्यता आहे.

२) इसुरू उदाना

३२ वर्षीय श्रीलंकन वेगवान गोलंदाज असलेला इसुरू उदाना हा प्रथमच आयपीएलमध्ये खेळतोय. तो मलिंगानंतर श्रीलंकेचा क्रमांक दोनचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. डेल स्टेन, क्रिस मॉरिस, केन रीचर्डसन यांसारखे‌ विदेशी वेगवान गोलंदाज संघात असल्याने उदानाला संधी मिळण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. या विदेशी दिग्गजां व्यतिरिक्त उमेश यादव, नवदीप सैनी व मोहम्मद सिराज यासारखे भारतीय आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज ही आरसीबीच्या ताफ्यात आहेत.

३) जोश फिलीप

हा सलामीवीर ऑस्ट्रेलियाचा नवीन टी २० स्टार म्हणून पुढे येत आहे. फिलिपला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. याच सोबत, आरसीबीच्या संघात भारतीय सलामीवीरांच्या रूपाने अनेक पर्याय आहेत. अंतिम अकरामध्ये फक्त चार विदेशी खेळाडू खेळवण्याच्या निर्णयामुळे फिलिपला संघात स्थान मिळवणे अवघड जाईल.

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना फ्लॉप ठरलेले ३ टी२० क्रिकेटमधील दिग्गज

५ वेळा क्रिकेट इतिहासात गोलंदाज झाले ओपनर, केल्या धमाकेदार खेळी

राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण

महत्त्वाच्या बातम्या – 

सचिन विराटच्या बॅटची काळजी घेणारा देतोय मृत्यूशी देतोय झुंज, काही क्रिकेटरकडून तर…

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?

जेव्हा घनिष्ठ मित्र असलेल्या रैनावरच चढला होता धोनीचा पारा; या माजी खेळाडूने सांगितला किस्सा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---