इंडियन प्रिमियर लीग(आयपीएल) 2020 चा मोसम 29 मार्च ते 24 मे दरम्यान रंगणार आहे. 29 मार्चला आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पहिला सामना रंगेल. तर 24 मेला अंतिम सामना मुंबई येथे होईल. याबद्दल बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने माहिती दिली आहे.
त्याचबरोबर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने निर्णय घेतला आहे की आयपीएल 2020मधील संध्याकाळचे सामने रात्री 8 वाजता सुरु होतील. तसेच 5 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार असल्याची माहितीही गांगुलीने आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक झाल्यानंतर दिली. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने 4 वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने 8 वाजता होतील.
हे होणार नवीन बदल –
यावेळी आयपीएलमध्ये पहिल्यांदाच बदली खेळाडू(कन्कशन सप्सटिट्यूट) आणि नोबॉलसाठी तिसरे पंच असणार आहेत. याबदद्ल गांगुली म्हणाला, ‘कन्कशन सप्सटिट्यूट आणि नो बॉल रुल हे दोन नवीन बदल या मोसमात असणार आहेत.’
बदली खेळाडूचा नियम मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरु झाला आहे. जर एखादा खेळाडू सामन्यात चेंडू लागून दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याऐवजी बदली खेळाडू संघात सामील होऊ शकतो. या नवीन नियमानुसार मागीलवर्षी झालेल्या ऍशेस मालिकेत स्टिव्ह स्मिथला चेंडू लागल्यानंतर मार्नस लॅब्यूशाने त्याचा बदली खेळाडू म्हणून खेळला होता.
तसेच मागीलवर्षी आयपीएलमध्ये अनेक नो बॉल दुर्लक्षित राहिले होते. त्यामुळे बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी नोबॉल तपासण्यासाठी तिसरे पंच असणार आहेत.
आयपीएल 2020 च्या आधी होणार चॅरिटी सामना –
आयपीएल 2020 चा पहिला सामना होण्याआधी आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये एक ‘ऑल स्टार गेम’ हा चॅरिटी सामना होणार आहे. याबद्दल गांगुली म्हणाला, ‘आयपीएल सुरू होण्याच्या तीन दिवस आधी हा ‘ऑल स्टार सामना’ होईल. स्टेडियम अद्याप तयार नसल्याने अहमदाबादमध्ये हा सामना होणार नाही. यातून होणारी कमाई कुठे दान करायची हे अजून ठरलेले नाही. ‘
एमएस धोनीची 'ती' जागा अजूनही राहते रिकामी, चहलचा मोठा खूलासा
वाचा👉https://t.co/DUrAbBdEDE👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @msdhoni @yuzi_chahal— Maha Sports (@Maha_Sports) January 28, 2020
आयपीएलपू्र्वी 'हा' खेळाडू करेल भारतीय संघात पुनरागमन; रिकी पाँटिंगचे भाकित…
वाचा- 👉https://t.co/QPjsu83FkQ👈#म #मराठी #Cricket @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020