शुक्रवारपासून (९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा थरार रंगणार आहे. या हंगामासाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी केली आहे. या हंगामासाठी फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या लिलावादरम्यानही सर्व संघांनी मोठ्या बोली लावत आपल्या संघांना बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येत आहे, हे हंगाम जसजसा पुढे जाईल तसे समजेल.
या हंगामासाठी चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात परदेशी खेळाडूंचा बोलबाला होता. आयपीएल लिलावात पहिल्यांदाच असे झाले की तब्बल ४ खेळाडूंना १४ कोटींच्या वर बोली लागली. यंदा आयपीएल लिलावासाठी बीसीसीआयने २९२ खेळाडूंची ६१ जागांसाठी अंतिम निवड केली होती. यातील एकूण ५७ खेळाडूंना बोली लागली.
आयपीएल २०२१ च्या लिलावात बोली लागलेल्या ५७ खेळाडूंमध्ये २२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच हे ५७ खेळाडू खरेदी करण्यासाठी ८ संघांनी मिळून तब्बल १४५ कोटी ३० लाख रुपये खर्च केले. ख्रिस मॉरिस हा केवळ या आयपीएल हंगामातीलच नाही तर आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला १६.२५ कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. तर काईल जेमिसन आणि ग्लेन मॅक्सवेलला अनुक्रमे १५ कोटी आणि १४.२५ कोटी रुपयांसह बेंगलोर संघाने आपल्या गोटात सामील केले.
यंदाच्या लिलावात पंजाब किंग्सने (किंग्स इलेव्हन पंजाब आधीचे नाव) सर्वाधिक ९ खेळाडू खरेदी केले. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्सने प्रत्येकी ८ खेळाडू खरेदी केले. तसेच चेन्नई सुपर किंग्सने ६ खेळाडू, मुंबई इंडियन्सने ७ खेळाडू आणि सनरायझर्स हैदराबादने ३ खेळाडू खरेदी केले.
लिलावानंतर सर्व संघांची संघबांधणी पूर्ण झाली. मात्र, त्यानंतर काही संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले, तर काही खेळाडूंनी माघार घेतली. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएल हंगामासाठी सर्व संघात कोणकोणते खेळाडू आहेत, हे पाहू.
आता आयपीएलमध्ये असे आहेत सर्व संघांचे खेळाडू –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – २२ खेळाडू (८ परदेशी)
विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, फिल ऍलेन, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनिएल सॅम्स, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तीन, सचिन बेबी, रजत पाटिदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभुदेसाई, कोना श्रीकर भरत.
Happy with today’s buys, 12th Man Army? 🤩
We surely did #BidForBold! 🤜🏻🤛🏻#PlayBold #IPLAuction #WeAreChallengers #ClassOf2021 pic.twitter.com/aD4uzSU8Xp
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 18, 2021
राजस्थान रॉयल्स – २४ खेळाडू (८ परदेशी)
बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, डेविड मिलर, अँड्र्यू टाय, संजू सॅमसन(कर्णधार), राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, अनुज रावत, रियान पराग, महिपाल रोमरोर, श्रेयस गोपाळ, मनन वोहरा, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, चेतन साकारिया, मुश्तफिजुर रेहमान, लियाम लिविंगस्टोन, केसी कारिप्पा, आकाश सिंग, कुलदीप यादव.
𝗡𝗲𝘄 𝗥𝗼𝘆𝗮𝗹𝘀 💗#HallaBol | #RoyalsFamily | #IPLAuction2021 pic.twitter.com/y73QoQ8GWv
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 18, 2021
मुंबई इंडियन्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, नेथन कुल्टर नाईल, ऍडम मिल्ने, पियुष चावला, जेम्स निशम, युधविर चरक, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडूलकर.
आपली #OneFamily 💙#MumbaiIndians #IPLAuction pic.twitter.com/jlKQEmP04F
— Mumbai Indians (@mipaltan) February 18, 2021
चेन्नई सुपर किंग्स – २४ खेळा़डू (७ परदेशी)
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी.
New entrants into the #SuperFam! #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/sSLqD0jESp
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 18, 2021
पंजाब किंग्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अगरवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरण सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, शाहरुख खान, मॉझेस हेन्रिक्स, डेव्हिड मलान, फाबियन ऍलेन, जलज सक्सेना, सौरव कुमार, उत्कर्ष सिंग.
Presenting #SaddaSquad for the season! 🦁👑
Khush ho tussi❓🥰#SaddaPunjab #PunjabKings #IPLAuction2021 pic.twitter.com/9sxgNsq0zu
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 18, 2021
सनरायझर्स हैदराबाद – २५ खेळाडू (८ परदेशी)
डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, मनिष पांडे, वृद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, बेसिल थँपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर ,अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग, केदार जाधव, मुजीब झारदान, जे सुचिथ.
#SRH vaari paata lo manam konna players 🧡#WelcomeToSRH #IPLAuction #OrangeArmy @JadhavKedar @Mujeeb_R88 pic.twitter.com/r8eM9TSC2K
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 18, 2021
दिल्ली कॅपिटल्स – २४ खेळाडू (८ परदेशी)
अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, डॅनियल्स सॅम्स, एन्रिच नॉर्किए, ख्रिस वोक्स, प्रविण दुबे, टॉम करन, स्टिवन स्मिथ, सॅम बिलिंग्ज, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमन हुसेन मेरिवाला, एम सिद्धार्थ.
𝚂𝚃𝙰𝚃𝚄𝚂: 𝙇𝙤𝙖𝙙𝙞𝙣𝙜 100%
🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩#WeRoarTogether 💙#YehHaiNayiDilli #IPLAuction #IPL2021 pic.twitter.com/Jx6ECwanye— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 18, 2021
कोलकाता नाईट रायडर्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, गुरकिरत मन सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारायण, इयॉन मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टीम सिफर्ट, शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, वेंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा.
Hi 👋@Cuttsy31 @ShelJackson27 @Sah75official @karun126 @harbhajan_singh @iampawannegi #KKR #HaiTaiyaar #IPLAuction #IPL2021 pic.twitter.com/Zr4ykU4UNu
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 18, 2021
या हंगामात साखळी फेरीत एकूण ५६ सामने होतील. त्यातील सर्वाधिक १० सामन्यांचे यजमानपद चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांना देण्यात आले आहे. अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने होती. अशाप्रकारे प्रत्येक संघाला एकूण ६ ठिकाणांपैकी चार वेगवेगळ्या ठिकाणी साखळी फेरीचे सामने खेळण्याची संधी मिळेल. तसेच या हंगात कोणताही संघ घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. सर्व संघ तटस्थ ठिकाणांवर सामने खेळतील.
साखळी फेरीत ११ डबल हेडर (एका दिवशी २ सामने) असतील, ज्यामध्ये ६ संघ दुपारचे ३ सामने खेळतील आणि २ संघ दुपारचे अवघे २ सामने खेळतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारचे सामने ३.३० वाजता सुरू होतील. तर संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅक्सवेलला १४.२५ कोटींची बोली लागल्यानंतर वीरेंद्र सेहवागने शेअर केला ‘हा’ व्हिडिओ
आयपीएल लिलावात १४ करोड रुपयांची कमाई करणारा झाय रिचर्डसन आहे तरी कोण? घ्या जाणून
वानखेडेवर पुन्हा तेंडुलकर! अर्जुनला मुंबई इंडियन्सने खरेदी केल्यानंतर मीम्सचा सुळसुळाट