आयपीएल 2021 च्या स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. 2021 मध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी 8 ही संघांनी आपली कंबर कसली आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लहान लिलाव हा 18 किंवा 19 फेब्रुवारीला चेन्नई येथे पार पाडण्याची शक्यता आहे अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. या हंगामासाठी सर्व संघाने तयारी करताना 20 जानेवारीला आपल्या संघात कायम केलेल्या खेळाडूंची आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती.
एएनआयला मिळालेल्या माहितीनुसार 2021 मध्ये होणार्या आयपीएल च्या चौदाव्या हंगामासाठी लहान लिलाव होणार आहे. हा लिलाव चेन्नईत होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौदाव्या हंगामाचा लहान लिलाव 18 किंवा 19 फेब्रुवारीला चेन्नईत आयोजित केला जावू शकतो. त्याचबरोबर याबद्दलचा अंतिम लवकर घेण्यात येईल.
IPL 2021: Mini auction to be held on February 18 or 19 in Chennai
Read @ANI Story | https://t.co/J9PmoFAt51 pic.twitter.com/2p8e9MpcwE
— ANI Digital (@ani_digital) January 22, 2021
सूत्रांच्या माहितीनुसार भारत आणि इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीला संपेल. त्यांनंतर आयपीएलच्या 14 व्या हंगामाचा लिलाव 18 किंवा 19 फेब्रुवारीला चेन्नई आयोजित केला जाऊ शकतो. यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जावू शकतो. त्याचबरोबर यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम भारतात खेळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची इच्छा आहे की होतील तेवढे प्रयत्न करून ही स्पर्धा भारतात खेळली जावी
आयपीएलचा 13 हंगाम हा यूएईत आयोजित करण्यात आला.
2020 पासून कोरोनाच्या महामारीमुळे जगात हाहाकार पसरला होता. त्यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईत खेळला गेला होता. परंतु यंदा या स्पर्धेसाठी भारतात वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे यंदा आयपीएलचा 14 हंगाम भारतात खेळला जाण्याची शक्यता आहे. कारण 10 जानेवारी पासून भारतामध्ये देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात झाली आहे. भारतात सर्व प्रथम कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा कोणत्याही अडचणी शिवाय पार पडत आहे. त्यामुळे यंदा आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन भारतात होण्याची जास्त शक्यता आहे.