---Advertisement---

आयपीएल लिलाव: स्टिव्ह स्मिथ झाला दिल्लीकर, ‘एवढ्या’ कोटींची लागली बोली

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 3:19 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या लिलावाला चेन्नईच्या ग्रँड चोला हॉटेल येथे सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठही संघ मिळून जास्तीत जास्त ६१ खेळाडूंवर बोली लावतील. ज्यामध्ये, २३ परदेशी खेळाडू असतील. लिलावाच्या सुरुवातीलाच अनेक मोठ्या खेळाडूंची बोली लावली गेली. ज्यामध्ये, ऑस्ट्रेलियाचा वरिष्ठ खेळाडू व राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याचा समावेश होता.

या संघात सामील झाला स्मिथ

बऱ्याच कालावधीनंतर आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या स्मिथवर अनेक संघांची नजर होती. स्मिथ यापूर्वी २०१४ आयपीएल लिलावात उतरला होता. आजच्या लिलावात स्मिथची आधारभूत किंमत २ कोटी रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्यामध्ये रस दाखवला. मात्र, बेंगलोरने पुन्हा बोली न लावल्याने तो २ कोटी २० लाख रुपयांसह दिल्ली संघात सामील झाला.

या संघांसाठी खेळला आहे स्मिथ

स्मिथ यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोची टस्कर्स केरला, पुणे वॉरियर्स इंडिया, राजस्थान रॉयल्स रायझिंग पुणे सुपरजायंट संघासाठी खेळला आहे. २०१० आयपीएलवेळी रॉयल चॅलेंजर बंगलोर संघातून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, २०११ व २०१२ आयपीएलसाठी तो अनुक्रमे कोची टस्कर्स केरला व पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा भाग होता. त्यानंतर त्याने राजस्थान रॉयल्स व रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचे नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वात पुणे संघाने २०१७ आयपीएल वेळी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---