मुंबई। रविवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आक्रमक खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधले. त्याच्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
जडेजाने शेवटच्या षटकात वसूल केल्या ३७ धावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून रविंद्र जडेजा ३ बाद १११ अशी संघाची अवस्था असताना १४ व्या षटकात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने सुरुवातीला अंबाती रायडूसह संयमी खेळ केला. मात्र, रायडू बाद झाल्यानंतर त्याने आक्रमक अंदाजात फलंदाजी केली.
त्याने अखेरच्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर तब्बल ५ षटकार मारले. जडेजाने शेवटच्या षटकात पहिल्या २ चेंडूंवर षटकार मारले. त्यानंतर हर्षलने तिसरा चेंडू नो बॉल टाकला. विशेष म्हणजे या चेंडूवरही जडेजाने षटकार मारला. तसेच नो बॉलमुळे १ धाव चेन्नई संघाला ज्यादाची मिळाली.
त्यानंतर पुन्हा जडेजाने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. चौथ्या चेंडूवर जडेजाने २ धावा पळून काढल्या तर पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा जडेजाने लांब षटकार ठोकला. जडेजाने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत एकूण वैयक्तिक ३६ धावा पूर्ण केल्या. तर या षटकात एकूण ३७ धावा वसूल झाल्या.
याबरोबरच जडेजाने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. तो डावाखेर ४ चौकार आणि ५ षटकारांसह २८ चेंडूत ६२ धावांसह नाबाद राहिला. त्याच्या या खेळीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Jaddu 💛🔥#CSK #CSKvRCB pic.twitter.com/PekSI0KjwO
— Sunanda Kumar (@sunanda_kumar_) April 25, 2021
https://twitter.com/DhavalBalai/status/1386294312267247617
चेन्नईने जिंकला सामना
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने जडेजाच्या आणि फाफ डू प्लेसिसने केलेल्या अर्धशतकामुळे २० षटकात ४ बाद १९१ धावांचा डोंगर उभा केला होता. डू प्लेसिसने ५० धावांची खेळी केली. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल, १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकात ९ बाद १२२ धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने ६९ धावांनी विजय मिळवला. बेंगलोरकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलने २२ धावा केल्या. याव्यतिरिक्त आणखी कोणाला खास काही करता आले नाही. चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
जडेजाच्या वादळी खेळीमुळे एका षटकात ‘अशी’ कामगिरी करणारा चेन्नई ठरला दुसराच संघ
जडेजा समोर थंडावते आहे ‘या’ स्फोटक फलंदाजाची बॅट, तब्बल पाच वेळा झालाय बाद
CSK vs RCB : जडेजा पडला आख्ख्या आरसीबी संघावर भारी! चेन्नईचा बेंगलोरवर ६९ धावांनी दमदार विजय