---Advertisement---

ऑफ टू दुबई! उर्वरित आयपीएल २०२१ साठी चेन्नई, मुंबई पाठोपाठ दिल्लीचा संघही पोहचला युएईमध्ये, पाहा व्हिडिओ

On: रविवार, ऑगस्ट 22, 2021 12:43 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघ शनिवारी(२१ ऑगस्ट) दुबईला रवाना झाला. दिल्ली कॅपिटल्सने यूएईला जाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आधीच युएईला पोहचले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. याशिवाय दिल्ली संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर देखील काहीदिवसांपूर्वीच युएईमध्ये पोहचला असून त्याने प्रविण आमरे यांच्यासह सरावालाही सुरुवात केली आहे.

दरम्यान, काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएलचा १४ वा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच २९ सामन्यांनंचर थांबवण्यात आला होता. त्यानंतर आता उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान खेळले जाणार आहेत.

उर्वरित ३१ सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथील स्टेडियमवर होणार आहेत. दुबईमध्ये १३ शारजाहमध्ये १० आणि अबू धाबीमध्ये ८ सामने होतील. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

https://www.instagram.com/p/CS1Wj_Dl-w_/

दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या आधारावर आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहेत. आयपीएल थांबण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एकूण आठ सामने खेळले. ६ सामने जिंकले आणि दोन सामने गमावले.

https://www.instagram.com/p/CS14CgxhWpb/

गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सने प्रथमच अंतिम फेरी गाठली होती
अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स २०२० मध्ये प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. तसेच त्याआधीही त्यांनी आयपीएल २०१९ मध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे गेल्या तीन हंगामातील दिल्लीची कामगिरी पाहाता, ते या हंगामाच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

युवा ऋतुराज गायकवाड एमएस धोनीकडून घेतोय फलंदाजीचे धडे, व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं

गुडन्यूज आली रे! महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो

राहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आहे आघाडीवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---