आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला एक चांगली बातमी मिळाली आहे. दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा खेळाडू फाफ डू प्लेसिस दुखापतीतून सावरताना दिसत आहे. तो पहिल्या सामन्याआधी मैदानात सराव करताना दिसला आहे. दुखापतीमुळे कॅरेबियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामना तो खेळू शकला नव्हता.
चेन्नई सुपर किंग्जच्या एका पदाधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टशी याबद्दल चर्चा केली. तो म्हणाला, “फाफ डू प्लेसिस अनिवार्य विलगीकरण पूर्ण करून संघासोबत सामील झाला आहे आणि सराव करायला सुरुवात केली आहे. त्याच्या फिटनेसवर अंतिम निर्णय उद्याच्या सामन्याच्या आधी घेतला जाईल.”
चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये फाफ पायाला पॅड बांधून शार्दुल ठाकूरसोबत चर्चा करत आहे. व्हिडिओत फाफ फलंदाजी करतानाही दिसत आहे. त्याच्याकडे पाहून असे वाटते की, तो मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सहभागी होऊ शकतो.
Entries in 5tyle 🔥#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/gydgMH30ga
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 18, 2021
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात फाफ चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. तो पाकिस्तान सुपर लीगमधील एका सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. पीसीएल २०२१ मध्ये दुखापत झाल्यानंतर त्याने स्पर्धेतील बाकी सामन्यांमधून माघार घेतली होती. त्यानंतर तो द हंड्रेड स्पर्धेत खेळताना दिसला होता. नुकत्याच्य पार पडलेल्या सीपीएलमध्येही त्याने बारबाडोस राॅयल्स विरुद्ध सेंट किट्स ऑंड नेविस पॅट्रियट्स संघासाठी शतक केले होते आणि त्यानंतर बारबाडोस राॅयल्सविरुद्ध ८४ धावा करून पुन्हा फार्ममध्ये आल्याचे संकेत दिले होते. मात्र, अशातच त्याला ग्रोइनची दुखापत झाल्याने सीपीएल २०२१ मधून अखेरच्या काही सामन्यातून माघार घ्यावी लागली होती.
Colour Code – FDP💛 . Have you got your #Yellove paint yet?#WhistlePodu 🦁 @faf1307 @imShard pic.twitter.com/5TIEC0V66c
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 18, 2021
सहसा ग्रोइनची दुखापत ठीक होण्यासाठी ४ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागतो. फाफला या दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो. स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञांच्या मते, कमरेच्या दुखापतीवर सर्वात चांगला उपाय म्हणजे आराम आहे. फाफचा विचार करता त्याला आतापर्यंत फक्त एका आठवड्याचा आराम मिळाला आहे आणि हा कालावधी दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा नाही. अशात फाफ पहिल्या सामन्यात खेळतो की नाही? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
माही मार रहा है! मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी धोनीने हवाई फटके खेळत दाखवला जलवा, पाहा व्हिडिओ
काही आले, तर काही गेले! आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यासाठी बदली खेळाडूंची संपूर्ण यादी