शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२१ चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात सीएसकेने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली. केकेआरचा कर्णधार ऑयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सीएसकेने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत १९२ धावांचा डोंगर उभा केला होता. सीएसकेच्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआर संघाचा डाव २० षटकात ९ विकेट्स गमावत १६३ धावांवरच गारद झाला होता.
सामन्यादरम्यान केकेआरचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला जीवदान मिळाले होते. त्यामुळे तो अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला होता. दरम्यान त्याला जीवदान कसे मिळाले, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सीएसकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआर संघाकडून गिल आणि व्यंकटेश अय्यर सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरले होते. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात दोघांनाही जीवदान मिळाले होते, ज्यामुळे दोघांनीही चांगली भागीदारी रचली होती. अय्यरचा झेल एमएस धोनीने सोडला होता, तर गिलचा झेल अंबातीने पकडूनही त्याला नाबाद देण्यात आले होते. कारण तो चेंडू स्पायडर कॅमेऱ्याला लागला होता.
Shubham Gill catch declared dead ball due to ball touching rope.#IPL2021Final #IPL2O21 #IPLFinal #CSK #KKR pic.twitter.com/pny5bSmmRW
— India @75 (@Minipedia__) October 15, 2021
झाले असे की, सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजा टाकत असलेला आपल्या दुसऱ्या आणि सामन्याच्या १० षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गिलने जोरदार फटका मारला. हा फटका खूप उंच गेला होता. हा झेल अंबाती रायुडूने अप्रतिमरीत्या झेलला. मात्र, गिल क्रीझ सोडून गेलाच नाही. टीव्हीवर दाखवल्यानंतर समजले की, चेंडू उंच हवेत गेल्यानंतर वरील स्पायडर कॅमेऱ्याला लागून रायुडूच्या हातात गेला होता. त्यामुळे गिलला जीवदान मिळाले आणि तो आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला.
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
गिलने यानंतर जडेजाच्या चेंडूवर चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक केल्यानंतर तो दीपक चाहरच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन बाद झाला. गिलने ४३ चेंडूत ५१ धावा केल्या. यामध्ये ६ चौकारांचा समावेश होता.
संबंधित बातम्या-
-प्रतिस्पर्धी असूनही ‘त्या’ प्रसंगानंतर धोनीने त्रिपाठीची थोपटली पाठ, कारण ऐकून छाती अभिमानाने फुगेल
-चेन्नईच्या प्रशिक्षकाचा मुंबईच्या प्रशिक्षकाला धोबीपछाड; फ्लेमिंगच्या नावे नवा आयपीएल विक्रम
-जिथे जाऊ, तिथे आमचाच बोलबाला! आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारे ५ खेळाडू