---Advertisement---

आरसीबीचे हेड कोच सायमन यांचा अचानक राजीनामा, आता ‘हा’ दिग्गज असेल नवा प्रशिक्षक

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा (आयपीएल) उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवला जाणार आहे. १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील थरारक सामन्याचे दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. तत्पूर्वी पहिल्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघात मोठे उलटफेर झाले आहेत. शनिवार रोजी (२१ ऑगस्ट) आरसीबी संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी वैयक्तिक कारणाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सायमन यांच्यानंतर आता संघाचे डायरेक्टर माईक हसन हे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. सायमन यांच्या ४६ व्या वाढदिवसादिवशी (२१ ऑगस्ट) माईक यांनी एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत यासंबंधी घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर सायमन हे मागील २ वर्षांपासून आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपद रुजू होते. तर हसन यांना क्रिकेट निर्देशकाच्या रुपात निवडण्यात आले होते. सायमन यांच्या प्रशिक्षणाखाली आरसीबीने २०२० मध्ये दमदार प्रदर्शन केले होते. आरसीबीला प्लेऑफपर्यंत पोहोचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती.

या हंगामातही भारतात खेळल्या गेलेल्या पहिल्या टप्प्यात आरसीबीचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. एकूण ७ सामने खेळत त्यातील ५ सामन्यात विजय मिळवत त्यांनी या स्थानावर ताबा मिळवला आहे. असे असताना, सायमन यांनी अर्ध्यातच संघाची साथ सोडणे हा आरसीबीसाठी मोठा धक्का आहे.

आरसीबी संघात ३ नव्या खेळाडूंचा प्रवेश
केवळ सायमन यांचा राजीनामा आणि माईक यांच्यावर मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी, हा एकच बदल आरसीबीमध्ये झाला नाही. तर याबरोबरच संघाने ३ खेळाडूंना मुक्त केले असून त्यांच्याजागी ३ नव्या खेळाडूंची निवडही केली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पा याच्याजागी श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाला निवडण्यात आले आहे. तसेच श्रीलंकेचा खेळाडू दुष्मंता चमीराला न्यूझीलंडच्या फिन ऍलेनच्या जागी संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल सॅम्सला वगळत सिंगापूरच्या टिम डेविडला संघात घेण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चॅलेंजर्स रेडी फॉर चॅलेंज! आरसीबीचा संघ ‘या’ दिवशी भरणार यूएईसाठी उड्डाण

हेडिंग्लेवर विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची टीम इंडियाला संधी, पाहा कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड

‘माही मार रहा है’! सरावादरम्यान धोनीने मारले एक से बढकर एक षटकार; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---