---Advertisement---

मोठी बातमी! राजस्थानला आणखी एक मोठा धक्का; स्टोक्सपाठोपाठ ‘हा’ प्रमुख खेळाडूही आयपीएलमधून बाहेर

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 7:30 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्स मागील दुष्टचक्र संपण्याचे नाव घेईना. चार सामन्यानंतर संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहे. तर, बेन स्टोक्स व लियाम लिव्हींगस्टोन हे दोघे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. आता राजस्थानसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा देखील आता आयपीएलमध्ये परतणार नसल्याचे नक्की झाले आहे.

आर्चर संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर २०१८ पासून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो. या वर्षी आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो कोपराच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे तो संघाशी जोडला गेला नव्हता. त्याचवेळी बातमी आली होती की, आर्चर दुखापतीतून सावरत असून चार सामन्यानंतर तो राजस्थान संघात सहभागी होऊ शकतो.

परंतु, नुकत्याच आलेल्या बातमीनुसार जोफ्रा आर्चर या वर्षी आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही. दुखापतीतून सावरला असला तरी, त्याने आयपीएलला महत्त्व दिले नाही. तो आपला काउंटी संघ ससेक्ससाठी काउंटी चॅम्पियनशिपच्या मध्यात खेळताना दिसेल. पुढील आठवड्यापासून तो सरावाला पुन्हा सुरुवात करणार आहे.

राजस्थानचे दोन खेळाडू झाले आहेत बाहेर
राजस्थान रॉयल्सला या हंगामात झटक्यावर चटके बसत आहेत. आर्चर पहिल्यांदा स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याची बातमी समोर आली. त्यानंतर हंगामातील पहिला सामना खेळून शर्मा दुखापतग्रस्त झालेला अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्स मायदेशी रवाना झाला. त्यापाठोपाठ, लियाम लिव्हींगस्टोनने बायो बबलमध्ये मानसिक त्रास होत असल्याचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली. त्याचबरोबर आता आर्चर संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसल्याचे पक्के झाले आहे.

राजस्थानचा ट्रम्पकार्ड आहे आर्चर
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला आर्चर राजस्थान रॉयल्ससाठी २०१८ आयपीएलपासून खेळत आहे. तो संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतो. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ३५ सामने खेळताना ४६ बळी आपल्या नावे केले आहेत. २०२० आयपीएलमध्ये तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

देवदत्त पडीक्कलच्या कामगिरीने ‘हे’ महान क्रिकेटपटूही झाले खुष; म्हणाले, लवकरच भारतीय संघाकडून खेळेल

धोनी पाठोपाठ कोहलीची देखील क्रेझ! राजस्थानच्या खेळाडूने सामना संपल्यावर घेतला ऑटोग्राफ

क्रिकेटपटूंनाही आवरला नाही धोनीचा ऑटोग्राफ घ्यायचा मोह; शाहरुख खानपाठोपाठ शेल्डन जॅक्सननेही शेअर केली ‘फॅनबॉय मुमेंट’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---